agriculture news in marathi, water scaricity increase in pune region, maharashtra | Agrowon

पुणे विभागात १५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे  : पुणे विभागातील सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या भागात पाऊस पडत असला तरी, कोरडवाहू पट्ट्यात पावसाची दडी कायम असल्याने टंचाई वाढू लागली आहे. विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात असलेल्या दोन गावे आणि सात वाड्यांमध्ये पुन्हा टॅंकर सुरू करावे लागले आहेत. शनिवारपर्यंत (ता.५) पुणे विभागातील सहा तालुक्यांमधील १६ गावे, ७७ वाड्यांमध्ये टंचाई असल्याने तेथे पाणीपुरवठा करण्यासाठी १५ टॅंकर सुरू असल्याचे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

पुणे  : पुणे विभागातील सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या भागात पाऊस पडत असला तरी, कोरडवाहू पट्ट्यात पावसाची दडी कायम असल्याने टंचाई वाढू लागली आहे. विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात असलेल्या दोन गावे आणि सात वाड्यांमध्ये पुन्हा टॅंकर सुरू करावे लागले आहेत. शनिवारपर्यंत (ता.५) पुणे विभागातील सहा तालुक्यांमधील १६ गावे, ७७ वाड्यांमध्ये टंचाई असल्याने तेथे पाणीपुरवठा करण्यासाठी १५ टॅंकर सुरू असल्याचे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

जुलै महिन्याच्या सुरवातीपासून विभागात पावसाने जोर धरला होता. धरणांच्या पाणलोटात होत असलेल्या दमदार पावसामुळे तळाशी गेलेल्या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला. मात्र दुसरीकडे कोरडवाहू भागात पावसाची उघडीप असल्याचे चित्र होते. एखाद दुसरी पावसाची सर वगळता अनेक गावांमध्ये जुलै कोरडाच गेला. ऑगस्ट सुरू झाल्यानंतर पावसाने सर्वदूर उघडीप दिली.

परिणामी, दुष्काळी पट्ट्यात पुन्हा टंचाई डोके वर काढू लागली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील १ गाव आणि ७ वाड्यांना, तर साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील एका गावाला नव्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा लागला आहे. पंधरा दिवसांपूर्वी (ता. २४ जुलै) विभागातील १४ गावे ७४ वाड्यांमध्ये १२ टॅंकरने पाणी देण्यात येत होते. यात पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या दोन गावे, २५ वाड्या, दौंड तालुक्याच्या १ गाव, ४ वाड्यांमध्ये, तर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ८ गावे ४२ वाड्यांना टंचाईच्या झळा बसत होत्या. त्यानंतर माण तालुक्यातील चार वाड्यांमधील टॅंकर बंदही करण्यात आले.

मात्र शनिवारपर्यंत पुरंदर आणि कोरेगाव तालुक्यात पुन्हा टॅंकर सुरू करावे लागले आहेत. शनिवारी पुण्यातील ४ गावे ३६ वाड्यांमध्ये ५ टॅंकरने, तर साताऱ्यातील १२ गावे आणि ४१ वाड्यांमध्ये १० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. पावसाची ओढ अशीच कायम राहिली तर विभागाच्या पाणीटंचाईत आणखी वाढ होणार आहे.
 

विभागातील पाणीटंचाईची तालुकानिहाय स्थिती
तालुका   गावे  वाड्या टॅंकर
बारामती २  २५
दौंड
पुरंदर  ७
खटाव
माण  ३८
कोरेगाव

 

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...