agriculture news in marathi, water scaricity in jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात २८ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 मे 2018
जळगाव : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असून, यामुळे दूध उत्पादक, शेतकरी, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे अमळनेर तालुक्‍यात असून, यापाठोपाठ पारोळा तालुक्‍यात ही समस्या आहे. जिल्ह्यात जवळपास २८ टॅंकर सुरू आहेत.
 
जळगाव : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असून, यामुळे दूध उत्पादक, शेतकरी, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे अमळनेर तालुक्‍यात असून, यापाठोपाठ पारोळा तालुक्‍यात ही समस्या आहे. जिल्ह्यात जवळपास २८ टॅंकर सुरू आहेत.
 
भुसावळ, भडगावमध्ये प्रत्येकी एक गाव टंचाईग्रस्त आहे. अमळनेरमधील २५ गावांमध्ये टंचाई आहे. पारोळ्यात सुमारे १६ गावे टंचाईग्रस्त आहेत. चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव, एरंडोलमध्येही पाणी टंचाईची समस्या आहे. जिल्ह्यात जवळपास २८ टॅंकर सुरू आहेत. मागील आठवड्यात दोन टॅंकर वाढविले आहेत. तसेच आणखी १० गावांकडून टॅंकर मागणीचे प्रस्ताव आले आहेत. तहसीलदारांना टॅंकर मंजुरीचे अधिकार दिले आहेत. परंतु, तरीही टॅंकर मंजुरीची कार्यवाही हव्या त्या गतीने होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 
अमळनेर व पारोळ्यात पर्जन्यमान कमी होते. यातच गिरणा व अनेर नदीलाही पूर आले नव्हते. यामुळे सद्यःस्थितीला अनेर व गिरणा काठावरील सुमारे ४० गावांमध्येही पाणीटंचाईची समस्या ऐरणीवर आली आहे. गिरणा नदीला अलीकडेच गिरणा धरणातून पाणी सोडले होते. हे पाणी जळगाव व धरणगाव तालुक्‍यातील शेवटच्या टोकातील गावांमध्येही पोचले होते. यामुळे टंचाईची समस्या काहीशी दूर होईल, अशी स्थिती असली तरी जूनमध्ये पाणीटंचाई भासणारच आहे.  
 
गिरणा काठावरील गावांमध्ये दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय ग्रामपंचायतींनी घेतला आहे. अनेर काठावरील गावांमध्येही असाच निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. भडगाव तालुक्‍यातील लिंबाच्या बागांना टॅंकरने पाणी काही शेतकऱ्यांनी दिले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. बात्सर, खेडगाव या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची स्थिती बरी आहे. परंतु उर्वरित गावांमध्ये स्थिती बिकट बनली आहे. खेडगाव शिवारातही शेतशिवारातील विहिरी कोरड्या पडत आहेत. 
 
धरणगाव व जळगाव तालुक्‍यांत गिरणा काठावरील गावांमध्ये शिवारातील कूपनलिकांची पाणीपातळी घटली आहे. मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून, पुढे पूर्वहंगामी कापसाची लागवड रखडणार आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने टॅंकर व तात्पुरत्या योजनांबाबत गतीने कार्यवाही करावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...