agriculture news in marathi, water scaricity in khanapur, sangli, maharashtra | Agrowon

खानापूर तालुक्‍यात तीव्र पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018
आमच्या परिसरात अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नाही. नेहमीच पाणीटंचाई असते. मात्र, पाणीटंचाई कमी करण्यासाठी प्रशासन कोणत्याही उपयायोजना करत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- काकासो पाटील, पळशी, ता. खानापूर, जि. सांगली.
विटा, जि. सांगली  ः खानापूर तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. बारा गावांमध्ये तीव्र टंचाई आहे. आठ पैकी भांबर्डे व लेंगरे तलाव कोरडे पडले आहेत. अन्य तलावांत अजूनही पाणीसाठा आहे. टंचाई असलेल्या गावात प्रशासनातर्फे विहिरी, बोअर अधिग्रहणाचे काम सुरू आहे. भांबर्डे, लेंगरे गावांनी टॅंकरची मागणी केली आहे.
 
कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या खानापूर तालुक्‍यात गेले दोन वर्षे पाणीटंचाई भेडसावत आहे. प्रशासनाने दोन वर्षे टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करून लोकांची तहान भागवली. दुष्काळी पट्टयातील गावांतून ‘टेंभू’चा कालवा गेल्याने सध्या पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे टंचाई थोडी सुसह्य आहे. परंतु खानापूर घाटमाथ्यावर अजूनही या योजनेची कामे अपुरी आहेत.
 
मध्यंतरी ‘टेंभू’च्या वितरिकेच्या निविदा मंजूर झाल्यात. वितरकांची कामे पूर्ण झाल्यास घाटमाथ्यावरील पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. परंतु सद्य:स्थितीला घाटमाथ्यावरील लोकांपुढे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे संकट उभे राहिले. घाटमाथ्यावरील सुलतानगादे, हिवरे, पळशी, मेंगाणवाडी, जखीनवाडी, पोसेवाडी, बलवडी (खा), गोरेवाडी येथे तात्पुरत्या स्वरूपात बोअर, विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. त्याचे पाणी लोकांना पिण्यासाठी पुरवले जात आहे. 
 
जोंधळखिंडी, देवनगर, सांगोले, भांबर्डे येथेही बोअर अधिग्रहण केले आहेत. या गावांसह अन्य गावांतही टंचाई तीव्र होणार आहे. बोअर, विहिरी अधिग्रहण केल्या असल्या तरी पाणीटंचाई लक्षात घेऊन टंचाईग्रस्त गावात टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी आहे. 
 
हिवरे, पळशी येथे मोठ्या प्रमाणात निर्यात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. अन्य गावातही द्राक्षासह अन्य बागायत क्षेत्र जास्त आहे. शेतीलाही पाणीटंचाईने ग्रासले आहे. द्राक्ष बागायतदार टॅंकरने पाणी विकत घेऊन द्राक्षबागा व अन्य फळपिके जगवित असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...