agriculture news in marathi, water scaricity in man taluka, satara, maharashtra | Agrowon

माणगंगा पाण्यासाठी आसुसलेलीच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 जुलै 2018

गोंदवले, जि. सातारा   : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम असला तरी पूर्वेकडील माण तालुक्‍यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. परिणामी, माण नदी अजूनही पाण्यासाठी आसुसलेलीच दिसते.

जिल्ह्यात पश्‍चिमेकडे पावसाची संततधार, तर पूर्वेकडे प्रतीक्षाच अशी भिन्न स्थिती दरवर्षीच पाहायला मिळते. राज्यात सर्वत्रच गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. परंतु, माणमध्ये त्याच्या उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. माणमध्ये अपवाद वगळता अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने पाणीसाठे कोरडेच आहेत.

गोंदवले, जि. सातारा   : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम असला तरी पूर्वेकडील माण तालुक्‍यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. परिणामी, माण नदी अजूनही पाण्यासाठी आसुसलेलीच दिसते.

जिल्ह्यात पश्‍चिमेकडे पावसाची संततधार, तर पूर्वेकडे प्रतीक्षाच अशी भिन्न स्थिती दरवर्षीच पाहायला मिळते. राज्यात सर्वत्रच गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. परंतु, माणमध्ये त्याच्या उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. माणमध्ये अपवाद वगळता अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने पाणीसाठे कोरडेच आहेत.

नेहमीच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी यंदा जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणात झाली आहेत. परंतु, त्यामध्ये पाणीसाठा होण्यासाठी पावसाची गरज आहे. तालुक्‍यातून वाहणाऱ्या माण नदीवर जागोजागी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, नदीपात्रातील बंधारे भरण्याइतका पाऊस झालेला नाही. सध्या तरी पावसाअभावी नदीसह अनेक जलस्त्रोत कोरडेच दिसतात.

बिजवडी  परिसरात पडलेल्या रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी व मूग या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. शेतकऱ्यांनी थोड्याफार पावसानंतर धुळवाफेवर पिकांच्या पेरण्या केल्या. पिके चांगली आल्यानंतर त्याची कोळपणी, खुरपणी करून घेतली. मात्र, नंतर पावसाने विलंब केल्याने पिके जळून जाण्याच्या मार्गावर होती.

मात्र, नुकत्याच पडलेल्या रिमझिम पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे. अजून एखादा हलका पाऊस झाला तरी मुगाचे चांगले उत्पादन निघेल. बाजरीसाठी दमदार पावसाची गरज आहे. मुगाला दर चांगला मिळत असल्याने बाजरीपेक्षा मूग पेरणीकडेच बहुतांश शेतकरीवर्गाचा कल वाढलेला दिसून येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...