agriculture news in marathi, water scaricity in marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील ३२१ गावांना ३९६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 एप्रिल 2018
औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत पाणीटंचाई भासत आहे. ३२१ गावे व ५३ वाड्यांना ३९६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाणीपुरवठ्यासाठी ८६३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
 
औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत पाणीटंचाई भासत आहे. ३२१ गावे व ५३ वाड्यांना ३९६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाणीपुरवठ्यासाठी ८६३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यातील २४५ गावे व २९ वाड्यांना एप्रिलच्या मध्यान्हात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावे, वाड्यांना पाणी पुरविण्यासाठी ३०० टॅंकरची सोय करण्यात आली असून, जिल्ह्यातील २८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गंगापूर तालुक्‍यात सर्वाधिक ८४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यापाठोपाठ फुलंब्री तालुक्‍यातील ३७, सिल्लोडमधील ३५, वैजापूरमधील २९, खुल्ताबादमधील २३, कन्नडमधील १७, पैठण तालुक्‍यातील एका गाव - वाडीला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
 
जालना जिल्ह्यातील ३५ गावे व ४ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावांना ४५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परभणी जिल्ह्यातील १७ गाव-वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, या गावांची तहान भागविण्यासाठी दहा टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. 
 
हिंगोली जिल्ह्यातील दोन गावे व एका वाडीला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे दोन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील २१ गावे व १८ वाड्या मिळून ३९ ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. येथे ३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बीड जिल्ह्यातील दोन गावांमध्ये पाणीटंचाई भासत असून, प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठ्यासाठी तीन टॅंकरची सोय करण्यात आली आहे.

पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरींच्या संख्येत २२० विहिरींची पडेली भर पाणीटंचाईची तीव्रता स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. गत आठवड्यात ६४३ विहिरींच्या अधिग्रहणातून टॅंकरसाठी व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणी पुरविले जात होते. या आठवड्यात ही संख्या ८६३ वर पोहचली आहे.

यामध्ये टॅंकरसाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींची संख्या २१७ तर टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींची संख्या ६४६ इतकी आहे.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...