agriculture news in marathi, water scaricity in miraj, sangli, maharashtra | Agrowon

मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 एप्रिल 2018
सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना होत आला तरी मिरज पूर्व भाग अजून तहानलेलाच आहे. टंचाई दूर करण्यास पाझर तलाव, बंधारे भरून घ्यावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरूच आहे. 
 
यंदा तीव्र पाणीटंचाई भासणार असल्याने तलाव प्राधान्याने भरून घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिले. त्याची कार्यवाही अद्यापही पाटबंधारे विभागाने केलेली दिसत नाही. त्यामुळे मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागातील बहुतांश तलाव कोरडेठाक आहेत.
 
सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना होत आला तरी मिरज पूर्व भाग अजून तहानलेलाच आहे. टंचाई दूर करण्यास पाझर तलाव, बंधारे भरून घ्यावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरूच आहे. 
 
यंदा तीव्र पाणीटंचाई भासणार असल्याने तलाव प्राधान्याने भरून घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिले. त्याची कार्यवाही अद्यापही पाटबंधारे विभागाने केलेली दिसत नाही. त्यामुळे मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागातील बहुतांश तलाव कोरडेठाक आहेत.
 
काही तलावातून मंदगतीने पाणीपुरवठा सुरू आहे. आरगचा मुख्य आधार असलेला पाझर तलाव दहा टक्केही भरलेला नाही.  मालगावच्या पाझर तलावातही अजून पाणी सोडलेले नाही. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन ‘गाव बंद’चा इशारा दिल्याने काही प्रमाणात पुरवठा सुरू झाला. मात्र बेडग पाझर तलावातही पाणी सोडलेले नाही. कळंबीला तीन ते चार आठवड्यांतून एकदा विहिरीतून पाणी मिळते आहे. कळंबी, तानंग येथील पाझर तलाव आणि बांध भरून घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 
म्हैसाळ योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटही घेतली. अजून पाणी पोहोचलेले नाही. सलगरेत सांभारे वस्ती तलाव भरला. मात्र महत्त्वाचा असणारा कुरणे तलाव कोरडाच आहे. त्यातून सलगरे, चाबुकस्वारवाडी आणि कदमवाडीला पाणीपुरवठा होतो. तलाव कोरडा असल्याने या तीन गावांत पाण्यासाठी दाहीदिशा वणवण सुरू आहे. 

भोसे, सोनी, सिद्धेवाडी, करोली, पाटगाव ही गावे पाणीटंचाईला तोंड देत आहेत. डोंगरवाडी योजनेतून पाणी सोडणे अपेक्षित आहे. पण कार्यवाही झालेली नाही. खटाव येथील दळवीवाडी रस्त्यावरील पाझर तलावात पाण्याचा ठिपूसही नाही. लिंगनूर तलावातील साठा संपुष्टात येत आहे. लिंगनूर व खटावचा पाणीपुवठा कसाबसा सुरू आहे. एरंडोलीत आरग आणि खंडेराजुरी रस्त्यावरील तलाव भरून घेण्याचे काम मंदगतीने सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूर्व भागात कृत्रिम दुष्काळ निर्माण झाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...