agriculture news in marathi, water scaricity in nashik, maharashtra | Agrowon

नाशिकमधील १०३ गावांना ३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 मे 2018
नाशिक  : उन्हाचा पारा जसजसा वर चढत आहे, तसतसे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाई असलेल्या १३२ गावे व वाड्यावस्त्यांची ११ तपासणी पथकांद्वारे पडताळणी करण्यात आली असून, त्यानुसार पाण्याची आवश्‍यकता असलेल्या ७ तालुक्‍यांमधील ६६ गावे व ३७ वाड्या अशा एकूण १०३ गावे, वाड्या, वस्त्यांना ३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.
 
नाशिक  : उन्हाचा पारा जसजसा वर चढत आहे, तसतसे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाई असलेल्या १३२ गावे व वाड्यावस्त्यांची ११ तपासणी पथकांद्वारे पडताळणी करण्यात आली असून, त्यानुसार पाण्याची आवश्‍यकता असलेल्या ७ तालुक्‍यांमधील ६६ गावे व ३७ वाड्या अशा एकूण १०३ गावे, वाड्या, वस्त्यांना ३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.
 
खरीप हंगामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रस्तावित व मंजूर गावातील पाणीटंचाईबाबत तपासणी पथक समित्या नेमून पडताळणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन याबाबत सूचना दिल्या.
 
तसेच पडताळणीसाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, उप अभियंता लघू पाटबंधारे विभाग, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांची एकूण ११ तपासणी पथके तयार करण्यात आली. प्रस्तावित व मंजूर टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून पाहणी अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे निर्देश या पथकांना दिले.
 
मंजूर ५५ गावे व ४२ वाड्या असे एकूण ९७ तर प्रस्तावित २० गावे व १५ वाड्या, असे एकूण १३२ गावे, वाड्या, वस्त्यांची पडताळणी समितीने तपासणी केली. तपासणी पथकाच्या पाहणी अहवालानुसार मंजूर व प्रस्तावित टंचाईग्रस्त गावांमधील ४ गावे वगळता इतर सर्व गाव व वस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्‍यकता असल्याचे निदर्शनास आले.
 
त्यानुसार जिल्ह्यात सद्यःस्थितीत ७ तालुक्‍यांतील ६६ गावे व ३७ वाड्या अशा एकूण १०३ गावे, वाड्या-वस्त्यांना ३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईने बिकट स्वरूप धारण केल्यास प्रशासनाने उपाययोजनांचे नियोजन केले असून, प्रत्येक टंचाईग्रस्त गावाला पाणी पुरविण्यात येणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...