agriculture news in marathi, water scaricity in parbhani, maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यात पाणीटंचाई वाढतेय
टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 मे 2018
परभणी : वाढते तापमान, बाष्पीभवन, उपसा आदी कारणांमुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे. अनेक तलाव कोरडे आहेत. विहिरी, बोअरची पाणीपातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे अनेक गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावरील ग्रामस्थांना पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. दिवसागणिक पाणीटंचाईची दाहकता वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या २६ पर्यंत वाढली आहे.
 
परभणी : वाढते तापमान, बाष्पीभवन, उपसा आदी कारणांमुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे. अनेक तलाव कोरडे आहेत. विहिरी, बोअरची पाणीपातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे अनेक गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावरील ग्रामस्थांना पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. दिवसागणिक पाणीटंचाईची दाहकता वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या २६ पर्यंत वाढली आहे.
 
रविवारी (ता. ६) पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात ३७.६९ टक्के, माजलगाव प्रकल्पात १८.९१ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात ३५.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. आठवडाभरामध्ये या तीन धरणांतील पाणीसाठ्यात अनुक्रमे ३.०८, २.३१, २ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या दोन्ही धरणांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. या धरणामध्ये आता केवळ मृत पाणीसाठ शिल्लक राहिला आहे.
 
करपरा मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्यात आठवडाभरात ३ टक्के घट झाली असून, रविवारी या धरणामध्ये १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. मासोळी धरणामध्ये आता केवळ मृत पाणीसाठा असून, त्यामध्येही घट होत आहे. धरणांवर अवलंबून असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे.
 
२२ लघु तलावांपैकी टाकळवाडी, जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, आडगाव, दहेगाव हे सहा तलाव कोरडे पडले आहेत. नखातवाडी, तांदूळवाडी, राणी सावरगाव, कोद्री, देवगाव, वडाळी, चारठाणा, केहाळ, भोसी या नऊ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेलेला आहे.
 
उर्वरित तलांवापैकी झरी (ता. पाथरी) येथील तलावांमध्ये जायकवाडी डाव्या कालव्याचे पाणी सोडण्यात आल्यामुळे पाणीसाठ्यामध्ये ९७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. पेडगाव तलावात ४, आंबेगाव तलावात २, पिंपळदरीत ७, कवडामध्ये ९, मांडवी मध्ये ३, पाडाळीमध्ये ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.  विहिरी, बोअर आटत चालले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी, टॅंकरची संख्या वाढत चालली आहे.
 
पालम तालुक्‍यात पाणीटंचाईची दाहकता सर्वाधिक आहे. या तालुक्‍यात ९ गावे आणि दोन वाड्यांना १३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पूर्णा तालुक्‍यातील पाच गावांना ५ टॅंकरने, गंगाखेडमधील २ गावे आणि दोन वाड्यांना ४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
 
सेलू तालुक्‍यात एका गावात १ टॅंकर सुरू आहे. जिंतूर तालुक्‍यातील ३ गावे, १ तांडा यांसाठी ३ टॅंकर सुरू आहेत. परभणी, सोनपेठ, पाथरी, मानवत हे तालुके अजून टॅंकरमुक्त आहेत. टॅंकरसाठी १४ आणि टॅंकरव्यतिरिक्त १३५, अशा एकूण १४९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...