राज्यातील ५२१ गावे, ३०७ वाड्यांमध्ये पाणीटंचाई

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राज्यात पावसाने दडी मारल्याने आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही राज्यातील पाणीटंचाई कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाने आेढ दिल्याने औरंगाबाद जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या असून, नगर, पुणे जिल्ह्यातही पाणीटंचाई वाढू लागली आहे. सोमवारपर्यंत (ता. ६) राज्याच्या नऊ जिल्ह्यांतील तब्बल ५२१ गावे आणि ३०७ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी ५३६ टॅंकर सुरू असल्याची माहिती राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे देण्यात आली.

जुलै महिन्यात पावसाने मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात पावसाने ओढ दिली. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वदूर पावसाची उघडीप आहे. औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, पुणे, सातारा, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये टंचाईच्या झळा कायम आहेत. अौरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टंचाई असून, गेल्या काही दिवसांत तेथील जवळपास १००हून अधिक गावांमध्ये टंचाई वाढल्याचे दिसून येत आहे.

२३ जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्यात २०२ गावे आणि २ वाड्यांमध्ये टंचाई होती. मात्र ६ आॅगस्टपर्यंत पाणीटंचाईत मोठी वाढ झाली असून, औंरगाबादमधील ३०५ गावे ११ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३२६ टॅंकर सुरू होते. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी राज्यातील ४५३ गावे, एक हजार ६३५ वाड्यांमध्ये टंचाई असल्याने ४४० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.

राज्यातील विभागीय टंचाईची स्थिती
विभाग गावे वाड्या  टॅंकर
नाशिक ११८  २१४  ९८
पुणे १६ ७७  १५
औरंगाबाद  २४४   १६   ३८०
अमरावती ४३  ० ४३
एकूण  ५२१     ३०७  ५३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com