agriculture news in marathi, water scaricity in tasgaon, sangli, maharashtra | Agrowon

येरळा नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 मार्च 2018
तासगाव, जि. सांगली  ः तालुक्‍यातील येरळा नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. येरळेत ताकारी, आरफळचे पाणी तातडीने सोडावे, अशी मागणी या गावांतून होत आहे. अर्ज, विनंत्या करून व निवेदने देऊनही प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही हालचाली होत नाही. त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नदीपात्रातील विहिरींची पाणीपातळी २५ फुटांखाली गेली आहे. दोन महिन्यांपासून येरळा नदी कोरडी पडली आहे.
 
तासगाव, जि. सांगली  ः तालुक्‍यातील येरळा नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. येरळेत ताकारी, आरफळचे पाणी तातडीने सोडावे, अशी मागणी या गावांतून होत आहे. अर्ज, विनंत्या करून व निवेदने देऊनही प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही हालचाली होत नाही. त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नदीपात्रातील विहिरींची पाणीपातळी २५ फुटांखाली गेली आहे. दोन महिन्यांपासून येरळा नदी कोरडी पडली आहे.
 
येरळा पात्रात तासगाव तालुक्‍यातील राजापूरपासून निमणीपर्यंत शेकडो विहिरी आहेत. नदीकाठच्या गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजनाही याच विहिरींवर अवलंबून आहेत. मात्र, सध्या येरळा पात्र कोरडे पडल्याने राजापूर, तुर्ची, ढवळी या गावांतून शेतीसह पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवू लागली आहे. पाणी योजना येरळा नदीतील पाण्यावर सुरू आहेत. मात्र, पात्रात पाणीच नसल्याने चक्‍क नदीकाठच्या गावांत एक दिवसाआड आणि अपुरा पाणीपुरवठा करण्याची वेळ आली.
 
काही वर्षे सलग येरळा बारमाही वाहिल्याने नदीकाठी बागायतीही मोठ्या प्रमाणात वाढली. ऊस आणि द्राक्षाचे क्षेत्र लक्षणीय वाढले. दुर्दैवाने दोन वर्षे केवळ पावसाळ्यात पाणी अशी पुन्हा स्थिती निर्माण झाली. ताकारी आणि आरफळचे पाणी वाझर बंधाऱ्यापर्यंत सोडले जाते. वाझर बंधारा भरल्यानंतर एक फळी काढून खालील गावांसाठी पाणी सोडण्यात येते. हे पाणी निमणीपर्यंत पोचते न पोचते तोच बंद होते.
 
परिणामी, या पाण्यावर कशीबशी शेती तग धरून आहे. येरळा काठावरील गावांतील विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली आहे. येरळा पात्रातील विहिरी तर पंधरा-वीस फुटांखाली गेल्या आहेत. द्राक्ष हंगाम सुरू आहे. त्यानंतर पाण्याची गरज भासणार आहे. तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. तीव्र आंदोलनाचाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
 
धरण उशाला कोरड घशाला, अशी स्थिती येरळा काठच्या शेतकऱ्यांची झाली आहे. नदीकाठची शेती असूनही त्याकरिता पाणी पुरवून वापरावे लागत आहे. पाणीपट्टी भरण्यास तयार आहोत; पण पाणी द्या, असा टाहो शेतकरी फोडताना दिसत आहेत. नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभाग, तहसीलदार यांना निवेदने दिली आहेत. मात्र, आरफळचे पाणी पलूस भागात सुरू असून, खाली तासगाव तालुक्‍यात मात्र सोडण्यात येत नसल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...