agriculture news in marathi, water scricity in pune region, maharashtra | Agrowon

पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. दुसरीकडे पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात पावसाची दडी कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील ५ तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा अद्यापही कायम आहेत. पुणे व सातारा जिल्ह्यांतील १५ गावे, ७५ वाड्यांना १४ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.  

पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. दुसरीकडे पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात पावसाची दडी कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील ५ तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा अद्यापही कायम आहेत. पुणे व सातारा जिल्ह्यांतील १५ गावे, ७५ वाड्यांना १४ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.  

पावसाने हजेरी लावल्यानंतर टंचाईग्रस्त तालुक्यांना दिलासा मिळाला. मात्र, या तालुक्यांमधील काही गावांमध्ये पाणीटंचाई दूर होण्यासाठी पुरेसा पाऊस पडला नाही. सातारा जिल्‍ह्याच्या खटाव, माण या दोन तालुक्यांतील ११ गावे आणि ३९ वाड्यांमधील १५ हजार ४४५ लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी ९ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्यांमध्ये ४ गावे, ३६ वाड्यांमधील ९ हजार ५४७ लोकसंख्येला ५ टॅंकरने पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.

पावसाचा खंड हेच पाणीटंचाईचे कारण
विभागात सध्या पाणीटंचाई जाणवत असलेले तालुके कोरडवाहू पट्ट्यात आहेत. या पट्ट्यात पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. यातच पावसाने उघडीप दिल्याने पडलेले खंड, पावसाचे असमान वितरण हेच पाणीटंचाईचे मुख्य कारण आहे. जून महिन्यात पडलेल्या पूर्वमोसमी पावसाने या तालुक्यांमध्ये सरासरी वाढली, मात्र टंचाई दूर करण्यास ती पुरेशी ठरली नाही.

त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाई कायम आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पडणाऱ्या एकूण पावसाचा विचार करता आतापर्यंत बारामती, दौंड, आणि माण तालुक्यात ५० टक्केही पाऊस पडलेला नाही. त्यामानाने पुरंदर आणि खटावमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
 

शनिवारपर्यंत (ता.१८) विभागातील पाणीटंचाईची तालुकानिहाय स्थिती
तालुके गावे वाड्या टॅंकर
बारामती  २ २५  ३
पुरंदर
दौंड  ४
खटाव  ३  ३
माण ८  ३६

 

रविवारपर्यंत (ता. १९) टंचाईग्रस्त तालुक्याची हंगामातील (जून ते सप्टेंबर) पाऊस स्थिती
तालुके एकूण पाऊस (मिमी)  पडलेला पाऊस टक्केवारी
बारामती ३५२.७  १४७  ४१.७
पुरंदर ३७५.४ २३५.५  ६२.७
दौंड ३१९.१ ११४.१  ३५.८
खटाव ३४४.० ३०७.२ ८९.३
माण  ३७४.८ ११८.९ ३१.७
      (स्राेत ः कृषी विभाग)

 

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...