agriculture news in marathi, water shortage in 30 villages of Khandesh | Agrowon

खानदेशातील ३० गावांत तीव्र पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

जळगाव : खानदेशात धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात सुमारे २० टॅंकर्स सुरू आहेत. टॅंकरची संख्या वाढत असून, जळगाव जिल्ह्यात १२ टॅंकर सुरू आहेत. तीव्र टंचाईग्रस्त गावांची संख्या खानदेशात ३० पर्यंत पोचली आहे. पुढे ही स्थिती आणखी बिकट बनेल, असे संकेत आहेत.

जळगाव : खानदेशात धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात सुमारे २० टॅंकर्स सुरू आहेत. टॅंकरची संख्या वाढत असून, जळगाव जिल्ह्यात १२ टॅंकर सुरू आहेत. तीव्र टंचाईग्रस्त गावांची संख्या खानदेशात ३० पर्यंत पोचली आहे. पुढे ही स्थिती आणखी बिकट बनेल, असे संकेत आहेत.

तापी काठावरील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, अमळनेर, शहादा, नंदुरबार, शिरपूर आदी तालुक्‍यांमधील गावांमध्ये स्थिती बरी आहे. परंतु गिरणाकाठावरील मोठ्या गावांमध्ये पाणीकपातीचे संकट आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील पाचोरा, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव, तर दक्षिण भागातील जामनेर, बोदवडमध्ये स्थिती बिकट आहे. जळगाव जिल्ह्यात १७ गावांमध्ये तीव्र टंचाई आहे. अमळनेर तालुक्‍यात ही गावे अधिक आहेत. दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणारी गावे जवळपास २०० पेक्षा अधिक आहेत.

धुळे जिल्ह्यातही सुमारे सहा गावांमध्ये टंचाईची समस्या आहे. शिंदखेडा, साक्री तालुक्‍यांत जलसंकट अधिक आहे. नंदुरबार जिल्ह्यातही सुमारे सात गावांमध्ये टंचाईस्थिती भीषण आहे. कोळदा, पळाशी, लहान शहादे या नंदुरबारपासून अगदी जवळ असलेल्या गावांमध्ये टंचाई वाढली आहे. पुढे ही समस्या वाढेल. कारण जलस्रोत आटू लागले आहेत. सध्या ऑक्‍टोबर हीटचा फटका बसत असून, रब्बीच्या पेरणीसाठी फारसे अनुकूल वातावरण नाही. कृत्रिम जलसाठे उपलब्ध असलेल्या भागातही पुढे फेब्रुवारी, मार्चमध्येच जलसंकट वाढेल. यामुळे केळी लागवड पाचोरा, भडगाव, जळगाव, जामनेर भागात कमी होईल, असे संकेत आहेत. कारण जामनेरातील तोंडापूर प्रकल्पात फक्त ५ टक्के साठा आहे.

वाघूरमध्येही फक्त ४६ टक्के जलसाठा आहे. पाणीटंचाई वाढत आहे. परंतु प्रशासन टंचाई आराखडा मार्गी लावत नसल्याचे चित्र आहे. अनके अधिकारी गैरहजर असतात. यामुळे कामे ठप्प होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

इतर बातम्या
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
सोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
आटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
कामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर  : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...