नांदेड जिल्ह्यातील ७६० गावांत संभाव्य पाणीटंचाई जाहीर

नांदेड जिल्ह्यातील ७६० गावांत संभाव्य पाणीटंचाई जाहीर
नांदेड जिल्ह्यातील ७६० गावांत संभाव्य पाणीटंचाई जाहीर

नांदेड : आगामी काळात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ७६० गावे, वाड्या, तांडे संभाव्य पाणीटंचाईग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडून आॅक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या नांदेड जिल्ह्यातील निरीक्षण विहिरीमधील भूजलपातळीच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये ऑक्टोबर २०१७ ते जून २०१८ या कालावधीत संभाव्य पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. एकूण ४७ पाणलोट क्षेत्रापैकी ४ पाणलोट क्षेत्रामध्ये भूजलपातळी खोल गेल्याचे आढळून आले आहे.

जिल्ह्यातील ६ पाणलोटांतील एकूण २१२ गावांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्प्यातच पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत ११ पाणलोटांतील २१६ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. अखेरच्या टप्प्यात म्हणजेच एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत २३ पाणलोटांतील एकूण ३३२ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com