agriculture news in marathi, water shortage in gadhinglaj and chandgad, kolhapur, maharashtra | Agrowon

गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात दहा गावांत पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्‍यांतील दहा गावांमधील ग्रामस्थांना एप्रिल ते जून दरम्यान पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. यातील नऊ गावांत खासगी विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहण करण्यात येणार असून तडशिनहाळ (ता. चंदगड) येथे तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजनेचा उपाय सुचवण्यात आला आहे. 

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्‍यांतील दहा गावांमधील ग्रामस्थांना एप्रिल ते जून दरम्यान पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. यातील नऊ गावांत खासगी विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहण करण्यात येणार असून तडशिनहाळ (ता. चंदगड) येथे तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजनेचा उपाय सुचवण्यात आला आहे. 

जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे त्या-त्या तालुक्‍यातील गावांचा सर्व्हे करून संभाव्य पाणीटंचाई जाणवणारी गावे, वाड्यांचा प्रस्ताव तयार केला जातो. ऑक्‍टोबर ते मार्चअखेर कुठेही टंचाई नसल्याचा अहवाल होता. परंतु, एप्रिल ते जून अखेरच्या टप्प्यात टंचाई जाणवणाऱ्या गावांचा प्रस्ताव तयार करून प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. चंदगड तालुक्‍यातील चार गावांत टंचाईची झळ बसणार असून ही गावे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी घोषित केली आहेत. गडहिंग्लज तालुक्‍यातील सहा गावात टंचाईसदृश्‍य स्थिती आहे. या गावांचेही प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे दिले आहेत. परंतु, ती गावे अद्याप घोषित झालेली नाहीत. 

जानेवारी ते मार्च या टप्प्यात गडहिंग्लजमधील १४ गावांमध्ये टंचाईसदृश्‍ा स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता गृहीत धरून पाणीपुरवठा विभागाने प्रस्ताव दिला होता. परंतु, हा प्रस्ताव उशिरा पोचल्याने आणि पाण्याची उपलब्धतताही मार्चअखेरपर्यंत असल्याने ही गावे घोषित झाली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, एप्रिल ते जून अखेरची गावे दोन दिवसांत घोषित करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. एप्रिल ते जून या कालावधीसाठी चंदगडमधील चार तर गडहिंग्लजमधील सहा गावे आहेत.

यातील बहुतांशी ठिकाणी खासगी कूपनलिका आणि विहीर अधिग्रहणाची शिफारस आहे. एकही नवीन कूपनलिका खोदाईचा समावेश नाही. गेल्या काही वर्षांपेक्षा यंदा टंचाईची झळ कमी असल्याचेही सांगण्यात येते. म्हणूनच टंचाईसदृश्‍ा गावच्या संख्येतही घट झाली आहे. आता घोषित केलेल्या गावांमध्ये तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. टंचाईची कामे पावसाळा तोंडावर आल्यानंतरच सुरू होतात, हा नेहमीचा अनुभव आहे. यंदा तरी किमान तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा संबंधित गावातील जनतेची आहे. 
 
टंचाईची गावे व उपाय   

  • गडहिंग्लज तालुका : शिंदेवाडी, नौकूड, मासेवाडी, बिद्रेवाडी, मनवाड, तुप्पूरवाडी (खासगी कूपनलिका व विहीर अधिग्रहणाचा उपाय)
  • चंदगड तालुका : बोंजुर्डी पैकी मोरेवाडी, जट्टेवाडीपैकी मजरे जट्टेवाडी, मौजे जट्टेवाडी (खासगी विंधन विहीर व विहीर अधिग्रहण), तडशिनहाळ (तात्पुरती नळ पाणी योजना)

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...