agriculture news in marathi, water shortage increase due to october heat, pune, maharashtra | Agrowon

`आॅक्टोबर हीट`ने वाढली पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

पुणे   : राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेल्याने ‘ऑक्टोबर हीट’ वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असून, औरंगाबाद, नाशिक, पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा वाढतच आहेत. सोमवारपर्यंत (ता. ८) राज्यातील ११ जिल्ह्यांमधील ३४२ गावे ४९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असून, ३५४ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सांगण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई अधिक असून, गेल्या वर्षी याच वेळी (ता. ९) राज्यातील १३८ गावे आणि १०७ वाड्यांना ९० टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता.

पुणे   : राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेल्याने ‘ऑक्टोबर हीट’ वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असून, औरंगाबाद, नाशिक, पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा वाढतच आहेत. सोमवारपर्यंत (ता. ८) राज्यातील ११ जिल्ह्यांमधील ३४२ गावे ४९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असून, ३५४ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सांगण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई अधिक असून, गेल्या वर्षी याच वेळी (ता. ९) राज्यातील १३८ गावे आणि १०७ वाड्यांना ९० टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता.

यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबर महिना कोरडाच गेला. त्यामुळे पाण्याची मागणी वाढू लागल्याने धरणांमधून पाणी सोडावे लागत आहे. यंदा धरणांमध्ये गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी पाणीसाठा असतानाच सप्टेंबरमधील पावसाच्या ओढीने पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. कोरडवाहू पट्ट्यामध्ये मॉन्सूनने दडी मारल्यानंतर परतीच्या पावसानेही समाधानकारक हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पिण्याचे पाण्याचे स्रोत आताच तळाशी गेले असल्याने पाणीटंचाईची समस्या वाढत आहेत. औंरगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक झळा बसत असून, नाशिक, नगर, जालना, पुणे, सातारा जिल्ह्यांत पाणीटंचाई वाढत आहे.

मराठवाड्यातील अौरंगाबाद विभागात १७५ गावे, ३ वाड्यांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी सर्वाधिक १९८ टॅंकर सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १५३ गावांसाठी १६० टॅंकर सुरू असून, नांदेड आणि बीड जिल्ह्यात नव्याने टॅंकर सुरू करावे लागले आहेत. नाशिक विभागात १३५ गावे, ३७३ वाड्यांना १२५ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर पुणे विभागातील २२ गावे १२२ वाड्यामध्ये २२ टॅंकरने, आणि अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यातील १० गावांना ९ टॅंकरने पाणी देण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले
आहे.  

 

साेमवारपर्यंत (ता. ८) जिल्हानिहाय पाणीटंचाई स्थिती
जिल्हा   गावे  वाड्या टॅंकर
नाशिक ५८ १७८ ५३
धुळे  ८  ० 
जळगाव १७  ११
नगर   ५२  १९५  ५४
पुणे   ७  ५७  ९
सातारा   १५   ६५  १३
अौरंगाबाद   १५३ १६०
जालना २०  २  ३५
बीड     १  ० 
नांदेड    १
बुलडाणा १०

 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...