agriculture news in marathi, water shortage increase, satara, maharashtra | Agrowon

माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

सातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस नसल्याने माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांतील अनेक गावांत पाणीटंचाई वाढत आहे. सध्या या तीन तालुक्‍यांतील १८ गावे व ८३ वाड्या-वस्त्यांवर १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

सातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस नसल्याने माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांतील अनेक गावांत पाणीटंचाई वाढत आहे. सध्या या तीन तालुक्‍यांतील १८ गावे व ८३ वाड्या-वस्त्यांवर १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात काही तालुक्यांत ओला तर दुसऱ्या बाजूस कोरडया दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या तालुक्यांमध्ये पाण्यावाचून पिके वाळल्याने उत्पादनात घट झाली आहे. रब्बी हंगाम तोंडावर आला असताना पाणीटंचाईत होत असलेली वाढ शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. माण, खटाव व कोरेगावमधील काही गावांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. या तीन तालुक्यांतील१८ गावे व ८३ वाड्या-वस्त्यांवरील २६ हजार ६४२ नागरिकांना १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्‍याला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा सहन कराव्या लागत आहे.

या तालुक्‍यात सर्वाधिक १५ टॅंकरद्वारे १४ गावे आणि ८० वाड्यावस्त्यांवरील २२ हजार २४९ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्‍यातील तीन गावे, तीन वाड्यावस्त्यांवरील ३११० नागरिकांना दोन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यातील एका गावातील १२८३ नागरिकांना एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. संरक्षित पाण्यासाठी तीन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ३, खटावमधील एका विहिरीचा समावेश आहे. अॅाक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या १३ होती. आता त्यात वाढ होऊन ही संख्या १७ वर  गेली आहे. सध्या पाऊसही नसल्याने पाणीटंचाईचे संकट अधिकच तीव्र होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...