सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्र

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत असून टॅंकर संख्येची द्विशतकाकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांतील १६० गावे आणि ७३३ वाड्यावस्त्यांवर १८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  

जिल्ह्यात पूर्वेकडील दुष्काळी तालुक्यांसह पश्चिमेकडील तालुक्यांत पाणीटंचाई तीव्र होऊ लागल्याने टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे सर्वच तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ११ तालुक्यांतील १६० गावे, ७३३ वाड्यावस्त्यांवरील तीन लाख तीन हजार ९२४ लोकसंख्येस १८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ९५ टॅंकरद्वारे ६७ गावे आणि ५२८ वाड्यावस्त्यांवरील एक लाख २६ हजार ७५४ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्‍यात २९ टँकरद्वारे ३७ गावे व १४५ वाड्यावस्त्यांवरील ६२ हजार ६८० लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यात ३० टँकरद्वारे २७ गावातील ७४ हजार ६१६ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्यात एका टँकरद्वारे एका गावातील ४१५ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

फलटण तालुक्यात १९ टँकरद्वारे १६ गावे व ४९ वाड्यावस्त्यांवरील २५ हजार ६१९ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. वाई तालुक्यात पाच टॅंकरद्वारे पाच गावे व दोन वाड्यावस्त्यांवरील ५१२० लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यात एका गावातील १२९३ लोकसंख्येस दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जावली तालुक्यात चार वाड्यावस्त्यांवरील १७५८ लोकसंख्येस तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  सातारा तालुक्यात एका टॅंकरद्वारे एक गाव व तीन वाड्यावस्तीवरील ६०४ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. कराड तालुक्यात दोन टँकरद्वारे दोन गावातील ३४३४ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. 

९७ विहिरींचे अधिग्रहण संरक्षित पाणीसाठ्यासाठी प्रशासनाकडून नऊ तालुक्यांतील ९७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये माणमधील २५, खटावमधील ३६, कोरेगावमधील सात, खंडाळ्यामधील एक, फलटण तालुक्यातील सात, वाईमधील १२, पाटणमधील एक, जावलीमधील तीन, महाबळेश्वरमधील चार विहिरींचा समावेश आहे. पाणीटंचाईच्या झळा जनावरांनाही बसत आहे. सध्या जिल्ह्यातील एक लाख १५ हजार १४० जनावरे पाणीटंचाईमुळे बाधित आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com