साताऱ्यात दमदार पावसामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी
विकास जाधव
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017
सातारा : जिल्ह्यात गेल्या सप्ताहात झालेल्या दमदार पावसामुळे ३९ गावे, तर १२५ वाड्यावस्त्यांवरील पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली आहे. या गावात सुरू असलेले २९ टॅंकर बंद करण्यात आले आहेत. सध्या १० टॅंकरद्वारे १६ गावे व ६३ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 
 
सातारा : जिल्ह्यात गेल्या सप्ताहात झालेल्या दमदार पावसामुळे ३९ गावे, तर १२५ वाड्यावस्त्यांवरील पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली आहे. या गावात सुरू असलेले २९ टॅंकर बंद करण्यात आले आहेत. सध्या १० टॅंकरद्वारे १६ गावे व ६३ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 
 
जिल्ह्यात गत सप्ताहात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले, तसेच रब्बी हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीसदेखील फायदा झाला आहे. गतसप्ताहात सोमवारी (ता.१८) जिल्ह्यात ३९ टॅंकरद्वारे ५५ गावे व १८८ वाड्यावस्त्यांवरील ९१ हजार ३९९ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला होता. मात्र, सोमवारी (ता.२५) जिल्ह्यातील १० टॅंकरद्वारे १६ गावे ६३ वाड्यावस्त्यांवरील २४ हजार १६६ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळी तालुक्‍यात झालेल्या दमदार पावसामुळे ३९ गावे १२५ वाड्यावस्त्यांवरील पाणीटंचाई दूर झाली असल्याने प्रशासनाकडून टॅंकरच्या संख्येत घट करण्यात आली आहे.
 
सध्या माणमधील ११ गावे ५० वाड्यावस्त्यांवर सहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्‍यात तीन गावे व १३ वाड्यावस्त्यांवर दोन, तर कोरेगाव तालुक्‍यात दोन गावांत दोन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्‍यातील पाणीटंचाई दूर झाल्यामुळे टॅंकर बंद करण्यात आले आहेत. 
 
पाणी संरक्षित ठेवण्यासाठी १६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ७, खटावमधील ८ तर कोरेगावमधील एका विहिरीचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...