मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र
मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

औरंगाबाद : पावसाची अवकृपा मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या झळा तीव्र करण्यास कारणीभूत ठरली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत २२ ची भर पडली असून, पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्याही २१ ने वाढविण्यात आली आहे. शिवाय गत आठवड्याच्या तुलनेत १६ विहिरींचेही अधिग्रहण टॅंकर व थेट पाणीपुरवठ्यासाठी वाढविण्यात आले आहे.

मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळाचे संकट ओढविते की काय अशी स्थिती आहे. संपूर्ण पावसाळ्यात प्रदीर्घ खंड व आता परतीचा पाऊसही औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद व परभरणी जिल्ह्यांतील बहुतांश भागांवर मेहरबान झाला नाही. त्यामुळे अशीच स्थिती कायम राहिल्यास पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत गत आठवड्यात फुलंब्री, पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर आदी तालुक्‍यांतील १४२ गाव व ३ वाड्यांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत होती. त्यासाठी १५५ टॅंकरची सोय करण्यात आली होती. औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत जवळपास १६५ विहिरींचे टॅंकरसह थेट पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहणही करण्यात आले होते.

२४ सप्टेंबर अखेर औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त गावे, वाड्यांच्या संख्येत २२ ची भर पडून ती संख्या १६४ गाव-वाड्यांवर पोचली आहे. टंचाईग्रस्त गाव, वाड्यांची संख्या वाढल्याने गत आठवड्यात पाणीपुरवठा करणाऱ्या १५५ टॅंकरची संख्याही २१ ने वाढून १७६ वर पोचली आहे. औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत पाणीपुरवठ्यासाठी १८१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९९, जालना जिल्ह्यातील ४४ व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ विहिरींचा समावेश आहे.

जिल्हानिहाय टंचाईग्रस्त गाव, वाड्या व टॅंकरची संख्या
जिल्हा गाव-वाड्या टॅंकरची संख्या
औरंगाबाद १४९ १५५
जालना १७ २१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com