राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर २०१६ मध्ये राज्यात तीव्र पाणीटंचाई भासली होती. यंदाचा दुष्काळ त्यापेक्षाही तीव्र असल्याचे दिसून येत आहे. या वर्षी जानेवारी महिन्यातच तब्बल १ हजार ४६१ गावे आणि ३ हजार २४३ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी १७८६ टॅंकर सुरू असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. औरंगाबाद विभागात सर्वाधिक पाणीटंचाई असून नाशिक, पुणे, अमरावतीपाठोपाठ कोकणातही पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. यावरून यंदा दुष्काळाची दाहकता अधिक असल्याचे दिसून येत आहे. 

२०१४ आणि २०१५ मध्ये राज्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे २०१६ मध्ये राज्यात तीव्र पाणीटंचाई जाणवली होती. जानेवारी २०१६ च्या अखेरीस राज्यात १ हजार ४३ गावे, १ हजार ४८८ वाड्यांमधील टंचाईग्रस्त नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी १ हजार ३९० टॅंकर सुरू होते. या वर्षी टंचाईची तीव्रता अधिक असल्याने २०१६ च्या तुलनेत जानेवारी महिन्यातच आणखी ४०० गावे, १८०० वाड्यांमध्ये ४०० टॅंकर सुरू करावे लागले आहेत. गतवर्षी याचकाळात टंचाईग्रस्त १९३ गावांसाठी १५९ टॅंकरने पाणी द्यावे लागत होते. उन्हाळ्यात वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाई आणखी वाढणार आहे. 

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील ८०९ गावे २९० वाड्यांमध्ये १ हजार ७६ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ४४१ गावे १८४ वाड्यांसाठी ५९४ टॅंकर सुरू आहेत. नाशिक विभागातील नगर, नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील ४५९ गावे, १ हजार ८४२ वाड्यांना ५०८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून, नगर जिल्ह्यात सर्वाधिक गावे व वाड्या पाणीटंचाईने बाधित झाली आहेत.

पुणे विभागातील सातारा, पुणे, सांगली आणि सोलापुरात पाणीटंचाई वाढू लागली असून, १५९ गावे १ हजार १०३ वाड्यांमध्ये १६७ टॅंकरने, अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यात ३१ गावांना ३० टॅंकरने, तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील ३ गावे ८ वाड्यांना ५ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे.   

राज्यातील पाणीटंचाईची विभागनिहाय स्थिती
विभाग गावे वाड्या टॅंकर
कोकण
नाशिक ४५९ १८४२ ५०८
पुणे १५९ ११०३ १६७
औरंगाबाद ८०९ २९० १०७६
अमरावती  ३१ ३०
एकूण  १४६१ ३२४३ १७८६
राज्यातील जानेवारीअखेरची टॅंकरची तुलनात्मक स्थिती
वर्ष गावे  वाड्या टॅंकर
२०१५ २४४ २८० ३४९
२०१६ १०४३ १४६६ १३९०
२०१७  ३४  ३२
२०१८ १९३ १५९
२०१९ १४६१ ३२४३ १७८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com