येवला, नांदगावसह सहा तालुक्यांत पाणीटंचाई

येवला, नांदगावसह सहा तालुक्यांत पाणीटंचाई
येवला, नांदगावसह सहा तालुक्यांत पाणीटंचाई
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडील धरणांच्या भागात धो-धो बरसलेला पाऊस पूर्वेकडील भागावर मात्र रुसलेला आहे. त्यामुळे एकीकडे धरणांतून विसर्ग करावा लागला. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील सहा तालुके अद्यापही तहानलेलेच असल्याची स्थिती आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाने या तालुक्यांत पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या ५१ टँकर्सला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा, नाशिक तालुक्यात धरणांतून सुरू असलेला पाणी विसर्ग थांबला आहे. धरणे ७५ टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत मिळून ५७ टक्के पाणीसाठा आहे. तरीही पूर्वेकडील मालेगाव-सिन्नर मध्येही प्रत्येकी ९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. ३४ विहिरी पिण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पाऊस लवकर न आल्यास यंदा भीषण टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
गिरणा खोऱ्यात ३४ टक्केच पाणी जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गिरणा खोऱ्यातील प्रकल्पात अद्यापही अवघा ३४ टक्केच पाणीसाठा आहे. गंगापूर धरणात ७६ टक्के आणि समूहात ७९ टक्के अर्थात ८१७२ दलघफू पाणी आहे. दारणा समूहात ७२ टक्के आणि धरणात ८५ टक्के पाणी आहे. पालखेड समूहात ७४ टक्के पाणी आहे. ओझरखेड, तिसगाव, पुणेगाव या तिन्ही धरणांत अवघा ३८ टक्केच पाणीसाठा आहे. आजच्या स्थितीत सर्व धरणांत मिळून ५७ टक्के म्हणजे ३७ हजार ५७५ क्युसेक इतकेच पाणी शिल्लक आहे. पाच धरणांतून विसर्ग सुरूच सध्या पाच धरणांतून मात्र विसर्ग सुरूच आहे. दारणातून ५५०, नांदूर मध्यमेश्वरमधून १६१४,  पुनदमधून ४१६, भावलीतून २६ आणि वालदेवीतून १६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे आणि टॅंकर
तालुका       गावे आणि वाड्या टॅंकर्स
येवला   ५० १७ 
नांदगाव ६६    ६ 
बागलाण १३  
देवळा      १
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com