agriculture news in marathi, The water stock in the dam started to grow | Agrowon

धरणांतील पाणीसाठा वाढू लागला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे ः गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. पडलेल्या पावसामुळे ओढे, नाले वाहू लागले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यातील २३ धरणांत एकूण ३७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला झाला आहे.  

पुणे ः गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. पडलेल्या पावसामुळे ओढे, नाले वाहू लागले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यातील २३ धरणांत एकूण ३७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला झाला आहे.  

पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात एकूण २३ धरणे आहेत. यात लहान मोठ्या धरणांचा समावेश असून, या धरणातील पाणीसाठ्यात उन्हाळ्यात चांगलीच घट झाली होती. जवळपास सहा ते सात धरणे कोरडी पडली होती. उर्वरित काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला होता. एक जूनपासून पुणे जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. दहा ते वीस जून या कालावधीत पावसाचा खंड पडला असला, तरी नंतरच्या कालावधीत या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

यंदा मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक जूनपासून आत्तापर्यंत ७७२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे. तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६९७, वडीवळे ४९३, पवना ४९१, वरसगाव ४६१, पानशेत ४५५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. उर्वरित धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बऱ्यापैकी ओढे, नाले वाहू लागले आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
१२८ मिलिमीटर, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११९, पवना १०३, वरसगाव ७२, पानशेत ७२, गुंजवणी ६०, वडीवळे ५६, नीरा देवघर ४४, कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

इतर ताज्या घडामोडी
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...
शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून...जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा...सांगली ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेती विमा...
आरक्षणासाठी आता ‘ठोक मोर्चा’ काढणारनाशिक :  देवेंद्र फडणवीस सरकार मराठा...
धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविलेनाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के...
ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी स्वतंत्र योजना...नागपूर  : वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना...
पीक कर्जवाटपात सातारा जिल्हा अव्वलसातारा  : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर ओसरलानगर  ः जिल्ह्यात सध्या फक्त अकोले तालुक्‍...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची साडेसहा...नगर  ः जलयुक्त शिवार योजनेतून २०१७-१८...
वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल...वाशीम   ः या मोसमात जिल्ह्यात आतापर्यंत...
पुणे जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्‍टरवर...पुणे   ः जून महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात...
सातारा जिल्ह्यातील सहा धरणांतून विसर्ग...सातारा   ः जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून...