agriculture news in marathi, Water stock in Marathwada is 52 percent | Agrowon

मराठवाड्यातील पाणीसाठा ५२ टक्‍क्यांवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

औरंगाबाद : परतीचा पाऊस मराठवाड्यातील काही भागात चांगला झाला असली तरी पाणीसाठा ५२ टक्क्यांवर आला आहे. डिसेंबरअखेर मराठवाड्यातील २८४ लघुप्रकल्पांसह १६ मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठ्याची अवस्था चिंतनीय असल्याची बाब समोर आली आहे.

आजपासून किमान सहा महिने सिंचनासह पिण्याच्या पाण्याची गरज साठलेल्या पाण्यातूनच करावी लागणार असल्याने त्यासाठी पाण्याच्या कार्यक्षम वापराचे नियोजन होण्याची गरज निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : परतीचा पाऊस मराठवाड्यातील काही भागात चांगला झाला असली तरी पाणीसाठा ५२ टक्क्यांवर आला आहे. डिसेंबरअखेर मराठवाड्यातील २८४ लघुप्रकल्पांसह १६ मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठ्याची अवस्था चिंतनीय असल्याची बाब समोर आली आहे.

आजपासून किमान सहा महिने सिंचनासह पिण्याच्या पाण्याची गरज साठलेल्या पाण्यातूनच करावी लागणार असल्याने त्यासाठी पाण्याच्या कार्यक्षम वापराचे नियोजन होण्याची गरज निर्माण झाली आहे.

डिसेंबरच्या मध्यान्हाअखेर मराठवाड्यातील ८६४ मोठ्या, मध्यम, लघुप्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा पन्नास दिवसात जवळपास ९ टक्क्‍यांनी घटला होता. १५ डिसेंबरअखेर मराठवाड्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये ५६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. तो आता ५२ टक्‍क्‍यांवरच आला आहे. मोठ्या संख्येने असलेल्या ७४३ लघु प्रकल्पांध्ये केवळ ४१ टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा २७ ऑक्‍टोबर नंतर मराठवाड्यातील सर्वच पाणीसाठ्यांमधील पाणीपातळी हळूहळू कमी होण्यास सुरूवात झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संकल्पीत साठ्याच्या तुलनेत ६४ टक्‍क्‍यांवर असलेला उपयुक्‍त पाणीसाठा डिसेंबरच्या सुरवातीला ५९ टक्‍क्‍यांवर तर डिसेंबरच्या अखेरीस ५२ टक्‍क्‍यांवरच आला आहे.

मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी व ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात अनुक्रमे ८ व ११ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. तर निम्न मनारमध्येही १८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी डिसेंबरअखेर ११ मोठ्या प्रकल्पांत ७० टक्‍के असलेला उपयुक्‍त पाणीसाठा यंदा मात्र याच तारखेअखेर ५२ टक्‍क्‍यांवरच आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी ८ प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीसाठाच शिल्लक नाही. तर औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यातील २८४ लघु प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठ्याची अवस्था चिंतनीय आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ९० लघुप्रकल्पात २३ टक्‍के, जालन्यातील ५७ लघुप्रकल्पात २७ टक्‍के, नांदेडमधील ८८ लघुप्रकल्पांत २६ टक्‍के, परभणीतील २२ लघुप्रकल्पात २४ टक्‍के तर हिंगोलीतील २७ लघुप्रकल्पांत २६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी डिसेंबरअखेर मराठवाड्यातील ७४३ लघु प्रकल्पात ६४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता तो यंदा केवळ ४२ टक्‍केच शिल्लक आहे.

इतर बातम्या
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...
मराठवाड्यातील ३२१ गावांना ३९६...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत...
राज्य बँकेने साखर मूल्यांकन १००...कोल्हापूर  : साखर उद्योगाचे शुक्‍लकाष्ट...
मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र... नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन...
नांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप... नांदेड :  नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू...
व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार...मनमाड, जि. नाशिक  : मनमाड कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव येथे आंबा ४५०० ते ८००० रुपये... जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांच्या वीज थकबाकीवरून...मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी...
पुणे जिल्हा बॅंकेकडून चौदा पिकांच्या...पुणे  ः शेतकरी घेत असलेल्या पिकांचा उत्पादन...
विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त...मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निकष पूर्ण...
आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताचीपरभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन...
पीकविमा परताव्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन...परभणी  ः जिल्ह्यातील पीकविमा परताव्यापासून...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
गुजरातमध्ये उन्हाळी पीक लागवड क्षेत्रात...मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी ...
उष्णतेच्या झळांनी विदर्भ होरपळलापुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट,...
वादळी पावसाने पिकांचे नुकसानपुणे : राज्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह...