agriculture news in marathi, Water stock in Marathwada is stable, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील जलसाठा स्थिर
संतोष मुंढे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्याचा टक्‍का गत पंधरवड्याच्या तुलनेत जवळपास स्थिर आहे. मध्यम व मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्यात जवळपास एक टक्‍का वाढ, तर लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात जवळपास दोन टक्‍के घट नोंदविली गेली आहे.

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांत गत आठवड्यात ६५.८४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा होता. तो ऑक्‍टोबरअखेर ६६.६१ टक्‍क्यांवर पोचला आहे. जायकवाडी, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सिनाकोळेगाव हे मोठे प्रकल्प तुडुंब झाले आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्याचा टक्‍का गत पंधरवड्याच्या तुलनेत जवळपास स्थिर आहे. मध्यम व मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्यात जवळपास एक टक्‍का वाढ, तर लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात जवळपास दोन टक्‍के घट नोंदविली गेली आहे.

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांत गत आठवड्यात ६५.८४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा होता. तो ऑक्‍टोबरअखेर ६६.६१ टक्‍क्यांवर पोचला आहे. जायकवाडी, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सिनाकोळेगाव हे मोठे प्रकल्प तुडुंब झाले आहेत.

मागील आठवड्याच्या तुलनेत जवळपास दोन दलघमीने पाणीसाठा वाढलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरीचा उपयुक्‍त पाणीसाठा मात्र १४ टक्‍क्‍यांवरच आहे. दुसरीकडे ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठाही १४ टक्‍क्‍यांवरच आहे. नांदेडमधील निम्न मनार प्रकल्पात केवळ २३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असून, निम्न दुधना प्रकल्पात ७८ टक्‍के, विष्णुपुरी ९९ टक्‍के, तर सिद्धेश्वर प्रकल्पात ५८ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे.

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात ६६.९९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा होता. त्यामध्ये जवळपास एक टक्‍क्‍याची वाढ होऊन हा पाणीसाठा आता ६७.६९ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. ७४३ लघू प्रकल्पांत गत पंधरवड्यात ५८.६५ टक्‍के असलेला उपयुक्‍त पाणीसाठा ऑक्‍टोबरअखेर ५६.५६ वर आला आहे.

तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ प्रकल्पांमध्ये गत पंधरवड्यात ७६.३४ टक्‍के असलेला उपयुक्‍त पाणीसाठा ७६.८० टक्‍क्‍यांवर, तर गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये ८३.२२ टक्‍के असलेला उपयुक्‍त पाणीसाठा आता ८५.७५ टक्‍क्‍यांवर पोचला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
सहा मध्यम प्रकल्पांत नाही उपयुक्‍त पाणी
मराठवाड्यातील सहा मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व सहा मध्यम प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यातीलच आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ ३५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील लघू प्रकल्पांचीही स्थिती समाधानकारक नसून, ९० लघू प्रकल्पांत केवळ ५७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे.

२०१६ मध्ये ऑक्‍टोबरअखेर मराठवाड्यातील ७४३ लघू प्रकल्पांत ८४ टक्‍के उपयुक्‍त पाणी होते. ते आता ५६ टक्‍केच आहे. दुसरीकडे ऑक्‍टोबरअखेरच मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांतही ८३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा होता, तो यंदा ६८ टक्‍क्‍यांवरच आहे.

 

इतर बातम्या
'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे...पुणे : टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाने ‘सकाळ’...
शेतकऱ्यांसाठी हमीभाव दिवास्वप्नचमुंबई : सध्या शेतीमाल हमीभावाच्या मुद्द्यावरून...
साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढकोल्हापूर : साखर दरात वाढ होत असल्याने त्याचा...
संयुक्त खतांच्या किमती वाढल्यानागपूर ः वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील...
हेक्टरी २९१ किलोच तुरीची खरेदीसांगली : वेळ सकाळी दहाची...जत तालुक्‍यातील शेतकरी...
सरकार कांदा खरेदी करण्याची शक्यतानवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना...
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपिटीची...पुणे ः कर्नाटकाचा उत्तर भाग आणि अरबी समुद्र, गोवा...
‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला...नवी दिल्ली : हवामानाच्या लहरीपणामुळे देशातील...
माझा शेतकरी चोर आहे का ः धनंजय मुंडेरावेर, जि. जळगाव ः मराठवाड्यातील गारपीटग्रस्त...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
राज्यातील धरणासाठा ५२.८३ टक्क्यांवरपुणे : राज्यात रब्बी हंगामात पाण्याचा मोठ्या...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’ खर्च करणार ‘केम...अकोला  ः कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास...
खतांवरील अनुदानाबरोबरच किमतीही हव्यात...खत उद्योगाच्या प्रगतीमध्ये केंद्र सरकार व राज्य...
आता आरोग्यासाठी ‘न्यूट्रासिटिकल्स’औषधनिर्माणशास्त्र आणि अन्ननिर्मितीशास्त्र...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर...पुणे  : राज्यातील ग्रामविकासाची भविष्यकालीन...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...