agriculture news in marathi, water storage in the dam in Khandesh | Agrowon

खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील प्रकल्प वगळता इतर धरणांमध्ये अत्यल्प साठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, पारोळा, चाळीसगावमधील मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. धुळे जिल्ह्यातही पांझरा, बुराई, मालनगाव प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांमध्ये जेमतेम साठा आहे. पावसाळ्याचे फक्त १२ दिवस राहिले आहेत. प्रकल्प, धरणे १०० टक्के भरतील की नाही, याबाबत प्रश्‍न आहे.

जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील प्रकल्प वगळता इतर धरणांमध्ये अत्यल्प साठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, पारोळा, चाळीसगावमधील मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. धुळे जिल्ह्यातही पांझरा, बुराई, मालनगाव प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांमध्ये जेमतेम साठा आहे. पावसाळ्याचे फक्त १२ दिवस राहिले आहेत. प्रकल्प, धरणे १०० टक्के भरतील की नाही, याबाबत प्रश्‍न आहे.

गिरणा धरणाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, भडगाव भागातील शेतीला रब्बीसाठी आवर्तन दिले जाते. २१ हजार हेक्‍टरला या धरणाचा लाभ होतो. त्यात फक्त ४८.४० टक्के जलसाठा आहे. या धरणातून फक्त दोनच आवर्तने यंदा रब्बीसाठी मिळतील, अशी माहिती आहे.

वाघूर धरणातही ४६.७३ टक्के जलसाठाअसून त्यातूनही फक्त दोनच आवर्तने रब्बीसाठी मिळू शकतील. त्यावर सात हजार हेक्‍टर क्षेत्रावरील रब्बी क्षेत्र अवलंबून असणार आहे. हतनूरमध्ये ९९.४५ टक्के जलसाठा आहे. यातून रब्बीसाठी तीन आवर्तने मिळतील. चोपडा, यावल, रावेर तालुक्‍यासाठी हतनूर धरणाचा लाभ होतो.

नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमध्ये १०० टक्के जलसाठा आहे. परंतु त्यातून पाणी शेतापर्यंत पोचू शकत नाही. या पाण्यामुळे फक्त विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 धुळे जिल्ह्यातील प्रकल्प साठा ( टक्के)
पांझरा प्रकल्प १००, मालनगाव ९९.१६, बुराई ८२.१३ , करवंद ६७.४७, अनेर ८४.५७, अमरावती ००

 जळगाव जिल्ह्यातील धरणांतील साठा (टक्के)
मन्याड, बोरी, अंजनी, भोकरबारी, बहुळा- ००, तोंडापूर ५.७१, गूळ ८५.७६, हिवरा ३४.०६, अग्नावती ७१.७६, अभोरा, मंगरूळ, सुकी -१००, मोर ५४.१६

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...