agriculture news in marathi, water storage Decreased | Agrowon

पाच लघू तलावांतील पाणीसाठ्यात घट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 डिसेंबर 2017

परभणी : जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांच्या तलावांपैकी ५ तलावातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. एका तलावातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. उर्वरित १६ तलावांमध्ये सरासरी २७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गतवर्षी सर्व लघू प्रकल्पांच्या तलावांमध्ये सरासरी ७३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. दिवसेंदिवस पाणीसाठा घटत चालल्यामुळे यंदा अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

परभणी : जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांच्या तलावांपैकी ५ तलावातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. एका तलावातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. उर्वरित १६ तलावांमध्ये सरासरी २७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गतवर्षी सर्व लघू प्रकल्पांच्या तलावांमध्ये सरासरी ७३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. दिवसेंदिवस पाणीसाठा घटत चालल्यामुळे यंदा अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील विशेषतः जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यांतील लघू तलावांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात पाणीसाठा जमा झाला नाही. त्यामुळे यंदा लवकरच जिंतूर तालुक्यातील आडगाव, दहेगाव आणि चिंचोली, नखातवाडी (ता. सोनपेठ), टाकळवाडी (ता. गंगाखेड) या तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

कोद्री तलावातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. तांदुळवाडी तलावामध्ये केवळ १ टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. रविवारी (ता.१०) झरी (६७ टक्के), आंबेगाव (४२ टक्के), पेडगाव (३२ टक्के), राणीसावरगाव (२३ टक्के), पिंपळदरी (१६.५९ टक्के), देवगाव (२४ टक्के), जोगवाडा (१२ टक्के), बेलखेडा (४२ टक्क), वडाळी (१८ टक्के), चारठाणा (५६ टक्के), केहाळ (१९ टक्के), भोसील (२३ टक्के), कवडा (२७ टक्के), मांडवी (५५ टक्के), पाडाळी (९१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी सर्व तलावांमध्ये ७३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.

गतवर्षी करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ८७ टक्के तर रविवारी (ता. १०) ६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये गतवर्षी ९१ टक्के, तर रविवारी (ता. १०) २१ टक्के आहे. गतवर्षी मुळी येथील गोदावरी नदी वरील बंधाऱ्याचे दरवाजे निकामी झाल्यामुळे यंदा या बंधाऱ्यात उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही.
गतवर्षी येलदरी आणि सिद्धेश्वर धरणांमध्ये अनुक्रमे २८.४७ आणि ४५.७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. रविवारी (ता. १०) येलदरीमध्ये १२.९६ टक्के आणि सिद्धेश्वरमध्ये ४३.३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

उपसा केला जात असल्यामुळे तसेच बाष्पीभवनामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट होत असल्यामुळे यंदा अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा लवकरच सोसाव्या लागणार आहेत.

इतर बातम्या
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...
पेट्रोलचा सर्वकालीन उच्चांक; सलग...नवी दिल्ली : रुपयाचे अवमूल्यन आणि खनिज तेलाच्या...
उपवासाने मूलपेशींच्या क्षमतेत होते वाढवाढत्या वयाबरोबरच मूलपेशींच्या कार्यक्षमतेमध्ये...
वनामकृविचे कुलगुरू मराठी भाषिक असावेतपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
शाकाहारामध्येही ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा...शाकाहारी आहार अधिक पोषक व संतुलित होण्यासाठी...
सिंचन विहिरी, फळबागांचा निधी थेट बँक...मुंबई: मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना सिंचन...
देशात खरीप पेरणीला प्रारंभनवी दिल्ली ः देशात खरीप हंगाम २०१८-१९ च्या...
‘डिमोशन’ रोखण्यासाठी अनेकांची पळापळ;...अकोला ः राज्याच्या कुठल्याही विभागात नसेल असा...
परभणी जिल्ह्यात कृषी अवजारे बँकेस...सगरोळी, जि. नांदेड : सगरोळी (ता. बिलोली)...
मराठवाड्यात आठ लाख ७५ हजार टन रासायनिक...औरंगाबाद: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत रासायनिक...
पाणी सर्वेक्षणासाठी पुणे विभागातील ११६...पुणे  ः विहीर, बोअरवेलसाठी आवश्यक भूगर्भातील...
मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत ७.७९...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत...
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने राबविली अर्ज...यवतमाळ : खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानापोटी नगरला...नगर ः कपाशीवर झालेल्या बोंड अळी प्रार्दुभावाच्या...
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; चंद्रपूर,...पुणे : विदर्भात उन्हाचा ताप वाढल्याने उष्णतेची...
कृषी विभागातील समुपदेशन बदल्या स्थगित;...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने...
सूत उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानीजळगाव : कापूस गाठींच्या उत्पादनाप्रमाणे सुताच्या...
नगर जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर :  जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता...
शेतीतील नव तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा...अकोला :  भारतीय शेतकरी जागतिक बाजारात...