कोल्हापूर जिल्ह्यात पाणीसाठा नव्वद टक्क्‍यांवर
राजकुमार चौगुले
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

गेल्या दोन-तीन दिवसांत मात्र धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचा पाणीसाठाही चांगलाच वाढला. अनेक धरणांचा पाणीसाठा नव्व्द टक्क्यांच्या वर गेल्याने धरणातील पाण्याच्या साह्याने होणारी विद्युतनिर्मिती पुन्हा गतीने सुरू होण्याची शक्‍यता आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रमुख धरणे नव्वद टक्के भरली अाहेत. पाऊस नसला तरी धरणांत पाणीसाठा समाधानकारक झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई कमी जाणवण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्याला वरदायिनी ठरणारे राधानगरी धरण शनिवारी (ता. २६) शंभर टक्के भरले. तुळशी, वारणा, दूधगंगा या धरणांतही नव्वद टक्‍क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे नजीकच्या काळात पिण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान व काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात थोडा अधिक पाऊस आहे. पंधरवड्यापूर्वी बहुतांशी धरणांत ८० टक्के पाणीसाठा झाला होता. त्या वेळी अनेक धरणांतील विद्युतनिर्मितीही सुरू झाली होती. परंतु पावसाने दडी दिल्याने काही धरणांतील पाणी सुरक्षित राहावे या हेतूने विद्युतनिर्मिती बंद ठेवून धरणातील पाणीसाठा वाढविण्याबाबत हालचाली सुरू झाल्या.

गेल्या दोन-तीन दिवसांत मात्र धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचा पाणीसाठाही चांगलाच वाढला. अनेक धरणांचा पाणीसाठा नव्व्द टक्क्यांच्या वर गेल्याने धरणातील पाण्याच्या साह्याने होणारी विद्युतनिर्मिती पुन्हा गतीने सुरू होण्याची शक्‍यता आहे.

सध्या बहुतांशी प्रमुख धरणांतील पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे नद्यांचे पाणीही वाढत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. संततधार पाऊस नसल्याने पूर येण्याची शक्‍यता मात्र कमी असल्याचे आपत्ती नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणसाठा (टीएमसीमध्ये) 
राधानगरी - ८.२६ (८.३६), तुळशी ३.४७ (३.४७१ ), वारणा ३४.११ (३४.३९९), दूधगंगा २२.९२ (२५.३९३), कासारी २.७१ (२.७७४ ), कडवी २.५१ (पूर्ण भरले), कुंभी २.६९ (२.७१५), पाटगाव ३.५८ (३.७१६), चिकोत्रा ०.५८ (१.५२२), चित्री १.८३ (१.८८६), जंगमहट्टी १.२२ (पूर्ण भरले), घटप्रभा १.५६ (पूर्ण भरले), जांबरे ०.७९ (०.८२०) आणि कोदे ०.२१ (पूर्ण भरले). 
 

इतर ताज्या घडामोडी
शीतकरण केंद्र बंद असल्याने दुग्धोत्पादक...अमरावती : वाशीम येथील शासकीय दुग्ध योजनेकडून...
पुणे बाजार समिती असुविधांच्या विळख्यात पुणे : राज्यात सर्वांत माेठ्या बाजार...
नाशिकला टोमॅटो ४५५ ते १६३५ रुपये क्विंटलनाशिक : नाशिक, नगर जिल्ह्यातून वाढलेली आवक,...
साताऱ्यात वाटाणा, वांगी, गवार तेजीत सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नागपूरमध्ये हरभरा सरासरी ५६४० रुपये...नागपूर ः कळमना बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून...
शेतकऱ्यांना न्याय मिळायवा हीच भूमिका :...अकोला : भारत हा कृषिप्रधान देश म्हटला जातो, मात्र...
साताऱ्यात दमदार पावसामुळे पाणीटंचाईची... सातारा : जिल्ह्यात गेल्या सप्ताहात झालेल्या...
‘सिद्धेश्‍वर’कडून गतहंगामातील उसाला... सोलापूर : दुष्काळ, कमी पाऊसमान यामुळे...
वऱ्हाडात मॉन्सूनपूर्व कपाशीचे नुकसान अकोला : गत आठवड्यात काही भागांत संततधार पाऊस...
गवारगमसह तांदूळ निर्यात वाढलीमुंबई ः अमेरिकेतून मागणी वाढल्याच्या...
उकाडा वाढलापुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने...
जळगावमध्ये नवती केळी १०२५ रुपये क्विंटल जळगाव ः मागील आठवड्याच्या सुरवातीला जिल्ह्यात...
सोलापुरात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या... सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत...
एक लाख हेक्टरने हरभऱ्याचा पेरा वाढणारपुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी...
राज्यात दुधाचा एकच ब्रॅँड बनविणार :...राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच...
जनताप्रश्नी सरकार अधिक संवेदनशील :...नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक...
पुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची...पुणे  ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
बुलेट-ट्रेनसाठी महाराष्ट्राला २५ हजार...नगर : मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते...
पावसाचा केळी, कापूस, मका, ज्वारीला फटका यावल, जि. जळगाव  : शहर व परिसरात या...
परभणीत गहू, हऱभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची... परभणी : येत्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात २...