Agriculture News in Marathi, Water storage in reservoirs, marathvada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यात उपयुक्‍त पाणीसाठ्याचा टक्‍का कमीच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 डिसेंबर 2017
औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ पाणीसाठ्यांमध्ये नोव्हेंबरअखेर केवळ ५९.६९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. यंदाचा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे पाणीसाठ्याबाबत ‘मागचं वर्ष बरं होतं’ अशीच काहीशी स्थिती आहे. 
 
औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ पाणीसाठ्यांमध्ये नोव्हेंबरअखेर केवळ ५९.६९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. यंदाचा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे पाणीसाठ्याबाबत ‘मागचं वर्ष बरं होतं’ अशीच काहीशी स्थिती आहे. 
 
मराठवाड्यात एकूण ८६४ मोठे, मध्यम, लघू बंधारे असून, त्यांच्या साठवणूक क्षमतेनुसार त्यामध्ये नोव्हेंबरअखेर  ५९.६९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पांमधील ६१.६३ टक्‍के, ७५ मध्यम प्रकल्पांतील ६२.४८ टक्‍के, ७४३ लघू प्रकल्पांत ४९.४० टक्‍के, गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये ७३.४७ टक्‍के, तेरणा, मांजरा व रेणा नद्यांवरील २४ बंधाऱ्यांमध्ये साठवण क्षमतेच्या तुलनेत असलेल्या ७४.३० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्याचा समावेश आहे. 
 
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडीचा उपयुक्‍त पाणीसाठा चाळीस दिवसांत तब्बल सात टक्‍क्‍यांनी घटला आहे. गत आठवड्यात जायकवाडीत २०७९ दशलक्ष घनमीटर उपयुक्‍त पाणीसाठा होता; तो ५६ दशलक्ष घनमीटरने घटून २०२३ दशलक्ष घनमीटरवर आला आहे. येलदरी प्रकल्पातील १३ टक्‍के, ऊर्ध्व पेनगंगामधील १४ टक्‍के व निम्न मनारमधील २० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्याचा अपवाद वगळता उर्वरित आठही मोठ्या प्रकल्पांमध्ये ३७ ते ९६ टक्‍क्‍यांदरम्यान उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 
 
हिंगोली, परभणी, नांदेड, जालना व औरंगाबाद या सहा जिल्ह्यांतील २८४ लघू प्रकल्पांमधील उपयूक्‍त पाणीसाठा त्यांच्या साठवण क्षमतेच्या तुलनेत २७ ते ३८ टक्‍क्‍यांदरम्यानच आहे. 
 
सात मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाणी नाही
औरंगाबाद जिल्ह्यातील सहा व नांदेड जिल्ह्यात एका मध्यम प्रकल्पात यंदा उपयुक्‍त पाणीच नाही. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील लाहुकी, गिरजा, वाकोद, अंजना पळशी, टेंभापुरी, बोरदहेगाव व नांदेड जिल्ह्यातील महलिंगी या मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. 
 
बीड, लातूर, उस्मानाबादमधील पाणीसाठा स्थिती चांगली
लघुू प्रकल्पांमधील पाणीसाठ्याबाबत बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील पाणीसाठ्याची स्थिती बरी असल्याचे पाणीसाठ्याचा टक्‍का सांगतो. या तीनही जिल्ह्यांत ४५९ लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठ्याचा टक्‍का अनुक्रमे ६७, ५६ व ६० इतका आहे.

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...