मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घट

मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घट
मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घट

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६८ प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होतो आहे. या प्रकल्पांमध्ये १४ डिसेंबरअखेरपर्यंत केवळ १९.०९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत केवळ १२.८४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. लघू प्रकल्पांपैकी १७० प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३२, जालना जिल्ह्यातील २८, बीडमधील ५२, लातूरमधील १०, उस्मानाबादमधील ४८ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. जवळपास २७४ लघू प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २९, जालना २०, बीड ५७, लातूर ६१, उस्मानाबाद ९२, नांदेड १३, परभणी जिल्ह्यांतील दोन लघू प्रकल्पांचा समावेश आहे. १३१ लघू प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. केवळ ९ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा असून ७६ लघू प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ८९ लघू प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 

एकूण ७५ मध्यम प्रकल्पांपैकी २० प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ५, जालना २, बीड ८, उस्मानाबाद जिल्ह्यातील ५ प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या २३ मध्यम प्रकल्पांत औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना ३, बीड ४, लातूर २, उस्मानाबाद ६ नांदेड व परभणी जिल्ह्यांतील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील केवळ एका मध्यम प्रकल्पात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. १८ मध्यम प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी, ७ प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍के तर ६ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

लघू, मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीपातळीवर  मराठवाड्यातील ७४९ लघू व ७५ मध्यम प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा गत तीन वर्षांतील आजच्या तारखेअखेर असलेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत नीचांकी पातळीवर आला आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत यंदा १४ डिसेंबरअखेर केवळ १३ टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. दुसरीकडे याच मध्यम प्रकल्पांमध्ये १४ डिसेंबर २०१६ अखेर ७४ टक्‍के तर २०१७ अखेर ५८ टक्‍के उपयुक्‍त पाणी शिल्लक होते. ७४९ लघू प्रकल्पांतही यंदा केवळ १३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. २०१६ अखेर लघू प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ७० टक्‍के, तर २०१७ अखेर ४६ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता.

प्रकल्पनिहाय उपयुक्‍त पाणीसाठ्याची स्थिती (टक्‍क्‍यांमध्ये) 
प्रकल्प संख्या उपयुक्‍त पाणीसाठा 
मोठे ११ २१.६५ 
मध्यम ७५ १३.१५ 
लघू ७४९ १२.८४ 
गोदावरी बंधारे ०९ ३८.८१ 
तेरणा, मांजरा २४ ३.९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com