agriculture news in marathi, Water supply to pipelines instead of tanker: Patil | Agrowon

टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा : पाटील
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील ७१८ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा न करता नागरिकांच्या घरापर्यंत पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा महसूलमंत्री पाटील यांनी रविभवन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल उपस्थित होते.

नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील ७१८ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा न करता नागरिकांच्या घरापर्यंत पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा महसूलमंत्री पाटील यांनी रविभवन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल उपस्थित होते.

जिल्ह्यात ४० दिवसांत सरासरी ८६.७४ टक्के पाऊस झाला. काटोल व कळमेश्वर या तालुक्यात गंभीर स्वरूपाचा, तर नरखेड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. जिल्ह्यातील इतर ८ महसूल मंडळांतील २६८ गावांचाही यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील सरासरी ६७ टक्के गावांमध्ये निकषानुसार आवश्यक उपाययोजना तात्काळ लागू करण्यात येत आहेत. दुष्काळग्रस्त गावांमध्ये समावेश नसलेल्या गावासंदर्भात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना निकष व क्षेत्रभेटीच्या आधारे गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, असे पाटील म्हणाले.

जनावरांना पिण्याचे पाणी, चारा पुरविण्याला प्राधान्य आहे. पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या नादुरुस्त व पूरक नळयोजनांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करता यावी, यासाठी निविदा प्रक्रियेचा कालावधी कमी केला. त्यामुळे येत्या फेब्रुवारीपासून अशा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल, या दृष्टीने नियोजन करावे. शून्य टॅंकर धोरण राबवावे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत प्रत्येक गावात कामांचे नियोजन करावे. यामध्ये गावातील पांदण रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. सर्व शाळांना संरक्षक भिंत बांधण्याचे कामदेखील तात्काळ पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात ६७ हजार ७३६ खातेदारांना ४२० कोटी ९ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. लाभार्थ्यांना कर्जमाफीसंदर्भातील माहितीपत्र द्यावे. त्यांना सातबारा प्रमाणपत्रेदेखील घरपोच द्यावीत. बोंडअळीच्या नुकसानभरपाईची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे. खरीप पीककर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयीकृत व जिल्हा बॅंकांद्वारे ५९२ कोटी ३२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना महसूलमंत्री पाटील यांनी दिल्या.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...