आषाढी वारीच्या पालखी मार्गावर टॅंकरने पाणीपुरवठा

आषाढी वारीच्या पालखी मार्गावर टॅंकरने पाणीपुरवठा
आषाढी वारीच्या पालखी मार्गावर टॅंकरने पाणीपुरवठा

सोलापूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी पालखी मार्गावर आवश्‍यक टॅंकरचा पुरवठा व विहीर अधिग्रहण करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी (ता. १३) दिली.

आषाढी वारीच्या नियोजनासाठी पंढरपुरात तुकाराम भवन येथे जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी व मानाच्या पालख्यांच्या विश्वस्तांची बैठक झाली. आमदार गणपतराव देशमुख, भारत भालके, प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ-महाराज, औसेकर महाराज उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख यांनी म्हणाले, ‘‘आषाढी वारी सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांना आवश्‍यक सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यामध्ये पिण्याचे पाणी, शौचालये, अखंडित वीजपुरवठा, सुरक्षेस प्राधान्य द्यावे. पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे, दुरुस्ती, पालखी मुक्कामाची, विसावा ठिकाणची कामे करण्याबरोबरच पालखी विश्वस्तांनी सुचविलेली कामे प्राधान्याने करा. पालखी मार्गावर पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्‍यक त्या विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. पालखी मार्ग व पंढरपूर, वाखरी व ६६५ एकर येथे पुरेशी शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत.

’’जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ‘‘या वर्षी आषाढी वारी सोहळ्यात स्वच्छतेला प्राधान्य असेल. वारीपूर्वी, नंतर पंढरपुरातील स्वच्छता करण्यात येईल. प्रदक्षिणा मार्गावर खचखडी न राहण्याची दक्षता घेण्यात येईल. प्रशासनातर्फे वारकऱ्यांना आवश्‍यक सेवा- सुविधा पुरविण्यास प्राधान्य असेल. कामाच्या नियोजनासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चंद्रभागा नदीत पुरेसे पाणी राहण्याची दक्षता घेतली आहे. जलसंपदा विभागामार्फत पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. पालखी मुक्काम, विसावा, एकर, वाळवंट येथे विद्युत वितरण कंपनीतर्फे तात्पुरते वीज कनेक्‍शन देण्याचे नियोजन आहे. वारकऱ्यांना केरोसीन, गॅस मिळण्याचे नियोजन केले आहे.’’

बैठकीत मानाचे पालखी विश्वस्त व पंढरपुरातील नागरिकांनी अनेक सूचना केल्या. त्यावर आवश्‍यक ती कार्यवाही केली जाईल, असे डॉ. भोसले यांनी सांगितले. प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आभार मानले. 

बैठकीतील ठळक मुद्दे 

पालखी मार्गावर प्रत्येक दोन किलोमीटरवर वैद्यकीय पथक, पालखी मार्गावर पोलिस बंदोबस्त, नदीपात्रातील खड्डे बुजवणार, पालखी मार्गावरील विद्युत वितरण कंपनीकडील रोहित्रांना कुंपण होतील. महाराष्ट्र राज्य  मार्ग परिवहन मंडळातर्फे सुमारे ३५०० बसचे नियोजन होईल.  ६५ एकरांमध्ये मोबाईल टॉवर होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com