agriculture news in Marathi, Water supply through 18 tanker in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११ गावे आणि १२ वाड्या तांड्यांना १८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १७६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पाणीटंचाई निवारणार्थ येत्या जून पर्यंतच्या करावयाच्या विविध उपाययोजनासाठी ६८ कोटी २२ लाख ३० हजार रुपये खर्चाचा आराखड्यास जिल्हा प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिली. गतवर्षीचा टंचाई उपाय योजनांसाठीचा २७ कोटी १४ लाख ६१ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे.

नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११ गावे आणि १२ वाड्या तांड्यांना १८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १७६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पाणीटंचाई निवारणार्थ येत्या जून पर्यंतच्या करावयाच्या विविध उपाययोजनासाठी ६८ कोटी २२ लाख ३० हजार रुपये खर्चाचा आराखड्यास जिल्हा प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिली. गतवर्षीचा टंचाई उपाय योजनांसाठीचा २७ कोटी १४ लाख ६१ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेल्या नांदेड आणि मुखेड तालुक्यांतील एकूण ११ गावे आणि १२ तांड्यांना ७ शासकीय आणि ११ खासगी असे एकूण १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाई उद्भवलेल्या ठिकाणी १३५ गावे व १० वाडी तांड्यांना पाणीपुरवठ्यासाठी १७६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आराखड्यानुसार २८ नवीन विंधन विहिरींना मंजुरी देण्‍यात आली आहे. तसेच नळ योजना विशेष दुरुस्‍ती ११ तर ५ तात्‍पुरत्‍या पूरक नळ योजनेला मंजूरी प्रदान करण्‍यात आली आहे. आजवर ७० विंधन विहिरींच्‍या विशेष दुरुस्‍तीची कामे पूर्ण करण्‍यात आली आहेत.

गतवर्षी ऑक्‍टोबर २०१७ ते जून २०१८ या कालावधीतील उपाय योजनांसाठीचा २७ कोटी १४ लाख ६१ हजार रुपयांचा निधी तीन टप्‍प्‍यांत जिल्‍हा परिषदेला प्राप्‍त झाला आहे. त्यातून जिल्ह्यातील १६ तालुक्‍यांत २ हजार ८२७ उपाययोजना हाती घेण्‍यात आल्‍या आहेत. यामध्ये नळ योजनेची विशेष दुरुस्‍ती, इंधन विहिरींची विशेष दुरुस्‍ती, नवीन इंधन विहीर घेणे, तात्‍पुरती पूरक नळ योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीर अधिग्रह आणि विहीर खोलीकरण, गाळ काढणे या उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत. 
 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...