agriculture news in marathi, Water supply through 35 tankers in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात ३५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

सातारा ः जिल्ह्यात माॅन्सूनचे दमदार आगमन होऊनही जिल्ह्यातील काही गावांत पाणीटंचाई जैसे थे आहे. सध्या आठ तालुक्‍यांतील ४२ गावे ११२ वाड्या वस्त्यावरील ४४ हजार ८१ लोकसंख्येस ३५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या सूत्रांनी दिली आहे.

सातारा ः जिल्ह्यात माॅन्सूनचे दमदार आगमन होऊनही जिल्ह्यातील काही गावांत पाणीटंचाई जैसे थे आहे. सध्या आठ तालुक्‍यांतील ४२ गावे ११२ वाड्या वस्त्यावरील ४४ हजार ८१ लोकसंख्येस ३५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्याचा अनेक भाग माॅन्सूनने व्यापला आहे. यामुळे खरिपातील पेरण्याची कामे सुरू झाली आहे. मात्र, असे असतानाही जिल्ह्यातील ४२ गावे तसेच ११२ वाड्यावस्त्यावर टॅंकरच्या पाण्यावर विसबून राहावे लागत आहे. माॅन्सूनच्या आगमनाने जिल्ह्यात नाममात्र आठ टॅंकरच्या संख्येत घट झाली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत ४२ गावे ११२ वाड्या वस्त्यांवरील ४४ हजार ८१ लोकसंख्येस ३५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये माण तालुक्‍याला टंचाईच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागत आहे. या तालुक्‍यात सर्वाधिक सात टॅंकरद्वारे १३ गावे आणि ७१ वाड्यावस्त्यांवरील १५ हजार ८८८ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे.

खटाव तालुक्‍यातील आठ गावे व २८ वाड्यावस्त्यांवरील १५ हजार ३३८ लोकसंख्येस सहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यात आठ गावांतील ३८२० लोकसंख्येस सहा टॅंकरद्वारे, खंडाळा तालुक्‍यातील एका गावातील ४१५ लोकसंख्येस एका टॅंकरद्वारे, वाई तालुक्‍यातील दोन गावे एका वाडीवस्तीवरील २६६१ लोकसंख्येस दोन टॅंकरद्वारे, पाटण तालुक्‍यातील एक गाव एका वाडीवस्तीवरील ५२५ लोकसंख्येस, जावली तालुक्‍यातील सात गावे नऊ वाडवस्त्यावरील ७५३० लोकसंख्येस दहा टॅंकरद्वारे व कराड तालुक्‍यातील दोन गावे व दोन वाड्यावस्त्यांवरील १७२४ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. संरक्षित पाण्यासाठी ४० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माण तालुक्‍यातील १२, खटाव १, कोरेगाव ८, फलटण ५, वाई ८, जावली ६ विहिरींचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...