agriculture news in marathi, Water supply through 69 tankers in Nagar district | Agrowon

नगर जिल्ह्यात ६९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

नगर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यामधील ६० गावे आणि २१९ वाड्यांवरील एक लाख २२ हजार लोकांना ६९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पाऊस लांबत असल्याने पाणीटंचाईत वाढ होत असून टॅंकरद्वारे पाणी देण्याची मागणीही होत आहे. जिल्ह्यात मागील पाच ते सहा वर्षांच्या काळात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. टॅंकरची संख्या अगदी अगदी ८०० पर्यंत गेली होती.

नगर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यामधील ६० गावे आणि २१९ वाड्यांवरील एक लाख २२ हजार लोकांना ६९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पाऊस लांबत असल्याने पाणीटंचाईत वाढ होत असून टॅंकरद्वारे पाणी देण्याची मागणीही होत आहे. जिल्ह्यात मागील पाच ते सहा वर्षांच्या काळात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. टॅंकरची संख्या अगदी अगदी ८०० पर्यंत गेली होती.

दोन वर्षांत झालेली जलयुक्त शिवार अभियानाची कामे आणि पावसाचेही प्रमाण चांगले असल्याने पाणीटंचाईचे प्रमाण कमी झाले. गेल्यावर्षी टॅंकरची संख्या १०० पर्यंत गेली होते. यंदा तर संपूर्ण उन्हाळ्यात टंचाई जाणवली नाही. अगदी बोटावर मोजण्याएवढ्या गावांत टॅंकर सुरू होते. मात्र आता पाऊस लांबत आहे.

त्यामुळे काही भागात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली असल्याने पावसाच्या तोंडावर टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. सध्या संगमनेर तालुक्‍यातील २१ गावे आणि ८४ वाड्यांना २३ टॅंकर, अकोले तालुक्‍यातील चार गावे आणि १९ वाड्यांना पाच टॅंकर, कोपरगाव तालुक्‍यात ३ गावे आणि ६ वाड्यांना तीन टॅंकर, नगर तालुक्‍यात सात गावांना सात टॅंकर, पारनेरला १६ गावे आणि ८० वाड्यांना १८ टॅंकर, पाथर्डी तालुक्‍यात ९ गावे आणि २४ वाड्यांना १२ टॅंकर अशा ६० गावे आणि २१९ वाड्या-वस्त्यांना ६९ टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. त्यात १६ सरकारी तर ५३ खाजगी टॅंकर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...