agriculture news in marathi, water supply through tankar status, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ४५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

नगर  : शिवारातील पाण्याचा ताळेबंद बिघडल्याने जिल्ह्यातील तहानलेल्या गावांची संख्या वाढू लागली आहे. या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आता जिल्हा प्रशासन सरसावले आहे. सुरवातीला केवळ दोन टॅंकर धावत होते. मात्र, मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ४७ गावे आणि १६८ वाड्या-वस्त्यांना ४५ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

नगर  : शिवारातील पाण्याचा ताळेबंद बिघडल्याने जिल्ह्यातील तहानलेल्या गावांची संख्या वाढू लागली आहे. या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आता जिल्हा प्रशासन सरसावले आहे. सुरवातीला केवळ दोन टॅंकर धावत होते. मात्र, मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ४७ गावे आणि १६८ वाड्या-वस्त्यांना ४५ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात तहानलेल्या गावांची संख्या वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. प्रशासनातर्फे जिल्हाभरातील ८२ हजार ८६७ लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या मागील १५ वर्षांत सातत्याने वाढत गेली. २०१५ मध्ये टॅंकरची संख्या तब्बल ८२८ एवढी होती.

कमी झालेला पाऊस, पडलेल्या पावसाचे पाणी साठविण्याची घटलेली क्षमता आणि शिवारात असणाऱ्या पाण्याचा अनिर्बंध उपसा करण्याची चढाओढ या प्रमुख कारणांनी तहानलेल्या गावांची संख्या वाढत गेली. हेच चित्र जिल्ह्यातील गाव-खेड्यांनी वर्षानुवर्षे अनुभवले. यंदा टॅंकर सुरू करण्याची मागणी करणारे प्रस्ताव सर्वप्रथम संगमनेर तालुक्‍यातून दाखल झाले. १२ एप्रिलला दोन टॅंकर जिल्हा प्रशासनाने मंजूर केले होते. आजअखेर टॅंकरची संख्या वाढून ती ४५ वर गेली आहे.
 

तालुकानिहाय टॅंकर स्थिती
तालुका टॅंकरसंख्या गावे
पाथर्डी २० १८
संगमनेर    १६ १८
पारनेर ८  १०
नगर 

 

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...