agriculture news in marathi, water supply through tanker in marathwada,maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील १९१ गावांना २२५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018
औरंगाबाद : मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. खासकरून औरंगाबाद जिल्ह्यात टंचाईच्या झळा अधिकतीव्र आहेत. त्यापाठोपाठ जालना, नांदेड, परभणी जिल्ह्यातही टंचाई वाढताना दिसत आहे. मराठवाड्यातील १९१ गावांना २२५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 
 
औरंगाबाद : मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. खासकरून औरंगाबाद जिल्ह्यात टंचाईच्या झळा अधिकतीव्र आहेत. त्यापाठोपाठ जालना, नांदेड, परभणी जिल्ह्यातही टंचाई वाढताना दिसत आहे. मराठवाड्यातील १९१ गावांना २२५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 
 
औरंगाबाद जिल्ह्यात १५१ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये सर्वाधिक ६५ गावे गंगापूर तालुक्‍यातील आहे. त्यापाठोपाठ फूलंब्रीमधील ३० गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिल्लोड तालुक्‍यातील २०, खुल्ताबाद तालुक्‍यातील १२, कन्नड, वैजापूर व औरंगाबाद तालुक्‍यातील प्रत्येकी ८ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
 
गंगापूर तालुक्‍यात सर्वाधिक ७१ टॅंकरद्‌वारे पाणीपुरवठा केला जात असून फूलंब्री तालुक्‍यात ३९, औरंगाबाद तालुक्‍यात १६, सिल्लोड तालुक्‍यात २९, वैजापूर, खुल्ताबाद तालुक्‍यात प्रत्येकी ९, कन्नड तालुक्‍यात ७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 
 
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यातील ६, जाफ्राबाद तालुक्‍यातील ८, परतूर तालुक्‍यातील १ मिळून १५ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी १८ टॅंकरची सोय करण्यात आली असून त्यापैकी ८ टॅंकर भोकरदन तालुक्‍यात, ९ टॅंकर जाफ्राबाद तालुक्‍यात तर १ टॅंकर परतूर तालुक्‍यातील टंचाईग्रस्त गावाला पाणीपुरवठा करत आहेत.
 
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्‍यातील ३ व पूर्णा तालुक्‍यातील १ मिळून चार गावांना व पालम तालुक्‍यातील एका वाडीला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. परभणीतील चार गावे व एका वाडीला पाणीपुरवठा करण्यासाठी ६ टॅंकरची सोय करण्यात आली आहे.  
 
नांदेड जिल्ह्यातील टंचाईचा सामना करणाऱ्या १२ गाव वाड्यांमध्ये नांदेड तालुक्‍यातील ५ गावे व १ वाडी, भोकर, हदगाव, माहूर तालुक्‍यातील प्रत्येकी १ वाडी, मुखेड तालुक्‍यातील ३ गावे व ४ वाड्या, किनवट तालुक्‍यातील २ गावे, माहूर तालुक्‍यातील दोन गावांचा समावेश आहे. टंचाईचा सामना करणाऱ्या नांदेडमधील बारा गाव - वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी १५ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. सिल्लोड तालुक्‍यातील चौदा गावांचे टॅंकरसाठीचे प्रस्ताव त्रुटीमुळे पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील टंचाईचा सामना करणाऱ्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३२३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये टॅंकरसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी ११२ तर टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठीच्या २११ विहिरींचा समावेश आहे. गत आठवड्यात अधिग्रहीत विहिरींची संख्या २७२ होती.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...