agriculture news in marathi, water supply through tanker status, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

नगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे. जिल्ह्यातील ९९ गावे, ४६० वाड्या-वस्त्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

नगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे. जिल्ह्यातील ९९ गावे, ४६० वाड्या-वस्त्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

दोन लाख २३ हजार ७०१ लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी ११५ टॅंकर धावत आहेत. जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. ४९७ मिलिमीटर सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पावसाळा संपताच पाणीटंचाईचे सावट जाणवू लागले आहे. खरीप हंगामापाठोपाठ रब्बीचा हंगाम वाया गेला. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील भूजलसाठ्यात घट झाली. त्यामुळे टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टॅंकर सुरू करण्यात आले. टॅंकरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या १७ वर्षांत २०१६ मध्ये सर्वांत जास्त ८२६ टॅंकर जिल्हाभरात सुरू होते. याद्वारे ५१६ गावे व दोन हजार वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा मात्र एक हजारांपुढे टॅंकर लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मंजुरीनंतर तत्काळ टॅंकर सुरू करण्यात येत आहेत.

टॅंकरची तालुकानिहाय संख्या
संगमनेर   २३
नगर
पारनेर २५
पाथर्डी ५३
शेवगाव १०
कोपरगाव

 

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...