पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता सातत्याने वाढतच आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील ९६ गावे ६५७ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत असून, पाणीपुरवठ्यासाठी ९२ टॅंकर सुरू आहेत. टंचाईग्रस्त भागातील सुमारे १ लाख ७९ हजार लोकसंख्या आणि २० हजार पशुधनाला टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. पुरवठ्यासाठी १०० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

पावसाने ओढ दिल्याने विभागात सप्टेंबर महिन्यापासूनच टंचाई भासू लागली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यापाठोपाठ सांगली आणि सोलापूरमध्येही टंचाईने डोके वर काढले आहे. भूजलाची पातळी खालावून विहिरी, बोअरवेल कोरडे पडले, पिण्याच्या पाण्याचे स्रोतही आटल्याने माणसांबरोबरच जनावरांनाही टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक ५७ हजार, पुण्यातील ५२ हजार, सांगलीतील ४६ हजार आणि सोलापुरातील सुमारे १० हजार लोकांना, तसेच साताऱ्यातील माण, फलटण, सोलापुरातील माढा तालुक्यातील १९ हजार ९०१ जनावरांना टॅंकरने पाणी पुरवावे लागत आहे.

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक टंचाई असून खटाव, माण, फलटण, कोरेगाव तालुक्यातील ४४ गावे २१९ वाड्यांना ३९ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. माण तालुक्याची पाणीटंचाई सर्वात तीव्र असून, ३५ गावे २०९ वाड्यांमध्ये ३१ टॅंकर सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातील २१ गावे २५२ वाड्यांमध्ये ३० टॅंकर, सांगलीतील २६ गावे १४९ वाड्यांना १८ टॅंकरने तर सोलापूरच्या माढा, करमाळा तालुक्यातील ५ गावे ३७ वाड्यांना ५ टॅंकरने पाणीपुरवठा देण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.  

विभागातील पाणीटंचाईची जिल्हानिहाय स्थिती
तालुके गावे वाड्या  टॅंकर
पुणे  २१ २५२ ३०
सातारा ४४ २१९ ३९
सांगली २६ १४९ १८
सोलापूर ३७ 
एकूण  ९६ ६५७ ९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com