agriculture news in marathi, Water tank is essential for abundant water supply | Agrowon

मुबलक पाणीसाठ्यासाठी जलयुक्त शिवार अावश्यक : हरिभाऊ बागडे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : गावांमध्ये कायमस्वरूपी मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली आहे. हे यश टिकवण्यासाठी ही योजना सातत्यपूर्णरीत्या राबविणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

औरंगाबाद : गावांमध्ये कायमस्वरूपी मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली आहे. हे यश टिकवण्यासाठी ही योजना सातत्यपूर्णरीत्या राबविणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये उत्कृष्ट योगदान दिलेल्या जिल्हा, तालुका, गाव, पत्रकार व अधिकारी, कर्मचारी यांना पुरस्कार वितरण शुक्रवारी (ता. २८) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर फुलंब्री तालुक्‍याचे नगराध्यक्ष श्री. शिरसाठ, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा कृषी अधीक्षक पी. एस. मोटे यांच्यासह इतर मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. बागडे म्हणाले, पाण्याचा मुबलक साठा ही आजच्या काळात आनंदाची बाब आहे. व्यापक उद्देशाने शासन जलयुक्त शिवार अभियान राबवत आहे. भविष्यात याच पद्धतीने सातत्य ठेवत आपल्याला अधिक भरीव व्यापक काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, ‘जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे’ यासह इतर सर्व कल्याणकारी योजनांमध्ये जिल्हा कायम अग्रेसर ठेवण्यासाठी सर्वांनी अशाच उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. या वेळी विभाग तसेच जिल्हा स्तरावरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यामध्ये विभाग स्तरावर उत्कृष्ट काम करणारा जिल्हा म्हणून राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कारामध्ये औरंगाबाद जिल्ह्यास द्वितीय पुरस्कार (रक्कम ५ लाख रु.) (विभागून) व खुलताबाद तालुक्‍यास द्वितीय पुरस्कार (विभागून) देण्यात आला. जिल्हा स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्‍यांचे पुरस्कार पुढीलप्रमाणे खुलताबाद प्रथम (५ लाख रु.)औरंगाबाद तालुका द्वितीय (३ लाख रु.) तर  जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट काम करणारे गावांसाठीच्या पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार मौजे महालपिंप्री, तालुका औरंगाबाद प्रथम (१ लाख रु.), मौजे पाचोड बु. तालुका पैठण द्वितीय (७५ हजार रु.), फुलंब्री, तालुका फुलंब्री तृतीय पुरस्कार (५० हजार रु.), मौजे बाजार सावंगी, तालुका खुलताबाद चौथा पुरस्कार (३० हजार रु.) व मौजे पालखेड, तालुका वैजापूर यांना पाचव्या क्रमांकाच्या पुरस्काराने (२० हजार रु.) गौरवण्यात आले.

पत्रकार व अधिकाऱ्यांनाही या वेळी गौरविण्यात आले. कार्यक्रमास विजेत्या गावाचे सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, संबंधित तालुक्‍याचे उपविभागीय अधिकारी (प्रांत), उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ, संबंधित अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
पशुपालकांना संस्थांनी मदत करावी ः शरद...निमगाव केतकी, जि. पुणे   ः सध्याच्या...
परभणी : धरणांच्या जलाशयातील उणे...परभणी ः वाढते तापमान, बेसुमार उपसा, वेगाच्या...
नाशिक : पाणीटंचाई आणि चाऱ्याच्या...अंबासन, जि. नाशिक : बागलाण परिसरातील गावागावांत...
देगावात दुष्काळाचा फळबागांना मोठा फटकावाळूज, जि. सोलापूर : यंदाच्या भीषण दुष्काळाचा...
वऱ्हाडाला केंद्रीय मंत्रिपदाची अपेक्षाअकोला : या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी...
केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या...मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत...
कॉँग्रेस नेते मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने...नगर  ः कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते...
सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला विनंती करू ः...शेटफळगढे, जि. पुणे : यूपीए सरकारच्या काळात आपण...
रत्नागिरी, कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम...पुणे  : ग्राहकांची विशेष पसंती असलेल्या...
नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे...नगर ः उसासोबत ज्वारीचे आगार म्हणून ओळख असलेल्या...
विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत १...अमरावती : विमा कंपन्यांच्या हेकेखोरपणापुढे...
यवतमाळ बाजार समितीत हळद खरेदीस प्रारंभयवतमाळ  ः जिल्ह्यात हळदीखालील क्षेत्रात वाढ...
शेतकऱ्यांना व्यापारी करण्यावर भर: कृषी...बारामती, जि. पुणे ः आपल्याकडे पिकणाऱ्या प्रत्येक...
पुणे बाजारात आले, टोमॅटोच्या भावात...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळ पाहूनही मदतीचं आश्वासन नाय दिलंकोल्हापूर/सांगली ः गेल्या महिन्यात आमच्याकडं...
अनेर काठावरच्या शिवारातही जाणवू लागली...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या...
जळगावात १८०; धुळे, नंदुरबारात टॅंकरची...जळगाव ः खानदेशात सुमारे एक हजार गावे टंचाईच्या...
लाकडी अवजारे हद्दपार; सुतारांवर...रिसोड, जि. वाशीम ः आधुनिकतेचे वारे शेतीतही वाहू...
कसणाऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास...विकसनशील देशांमध्ये कृषी उत्पादकता आणि उत्पन्नाची...
जळगाव बाजार समितीती कांदा दरात सुधारणाजळगाव ः लाल कांद्याची आवक अस्थिर असून, दरात मागील...