agriculture news in marathi, water will be released form Ujani dam | Agrowon

उजनीतून २ जूनला भीमेत पाणी सोडण्याचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

भीमा नदीतून आता जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडण्यात येणार आहे. शहर व ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी भाट निमगाव ते चिंचपूर बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यापुढे आणखी बरूर, हिंगणी, खानापूर व हिळ्ळी बंधारे आहेत. परंतु, चिंचपूर बंधाऱ्यापर्यंतच पाणी सोडले जाणार आहे. त्यासाठी किमान १० टीएमसी पाणी लागेल.
- एम. कामाची, उपअभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

सोलापूर  : उजनी धरणातील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत असून सध्या धरणातील पाणीसाठा आता मायनस २.९६ टक्‍क्‍यांवर गेला आहे. सध्या कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात आले असून सीना नदीवरील कोळेगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी पोचले आहे. परंतु, ते बंद करून २ जूनपासून भीमा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणतर्फे करण्यात आले आहे.

कालवा समितीच्या बैठकीतील नियोजनाप्रमाणे आता दोन आर्वतने सोडण्यात आली आहेत. परंतु, उजनीतील पाणी मायनस २६ टक्‍क्‍यांपर्यंत वापरण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी शासनाकडे पाठविला आहे. आता पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने चिंचपूर बंधाऱ्यांपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे.

भीमा नदीत शेतीसाठी पाणी सोडण्याची तरतूद नाही. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पिण्याकरिता आकस्मित आरक्षणाद्वारे ग्रामीण व शहरी पाणीपुरवठ्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्यात येते, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाद्वारे सांगण्यात आले. भीमा नदीवरील २३ बंधाऱ्यांपैकी औज बंधारा (१.६६ दशलक्ष घनफूट) तर चिंचपूर बंधाऱ्यात २.१६ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. उर्वरित भाट निमगाव, टाकळी, शेवरे, वाफेगाव, मिरे, जांभूड, पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, मुंढेवाडी, पुळूज, बठाण, माचणूर, वडापूर, अरळी, भंडारकवठे, लवंगी या बंधाऱ्यांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठाच शिल्लक नाही.

 

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...