agriculture news in marathi, water will get for irrigation from the pench projects | Agrowon

पेंच प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

भंडारा  : पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (ता. १०) जाहीर केला. नागपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अपुरा पाऊस व पावसाच्या खंडामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यांतील लाभक्षेत्रातील शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.

भंडारा  : पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (ता. १०) जाहीर केला. नागपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अपुरा पाऊस व पावसाच्या खंडामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यांतील लाभक्षेत्रातील शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाने सिंचनासाठी उपयुक्त जलसाठ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे या वेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.

बावनकुळे म्हणाले, ‘‘मध्य प्रदेशातील चौराई येथे सिंचन प्रकल्पाच्या बांधकामामुळे या वर्षी तोतलाडोह व पेंच प्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे. या प्रकल्पातून नागपूर शहर, नगरपालिकेला पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून, सिंचनासाठीसुद्धा पाणी देण्यात येते. परंतु या वर्षी केवळ तोतलाडोह प्रकल्पात थोडासा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १०० दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.``

‘‘या संदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचेकडे झालेल्या बैठकीत पाण्याची उपलब्धता, पाणी मागणी लाभक्षेत्रातील पिकांची नाजूक अवस्था, भात लावणीसाठी लागणारे अत्यावश्यक पाणी, या बाबींचा विचार केल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला,`` असे त्यांनी सांगितले.

पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पाणीवापर संस्थांनी संरक्षित सिंचनासाठी अग्रक्रमाने पाण्याचा वापर करावा. याव्यक्तिरिक्त उर्वरित पाणी नागपूर शहर व इतर बिगर सिंचन मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी नागपूर यांनी राखून ठेवावे. पाण्याची चोरी होणार नाही व पाण्याचा अपव्यय होणार नाही याचीही जबाबदारी घ्यावी, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...