agriculture news in marathi, Water will leave for Jayakwadi tomorrow | Agrowon

जायकवाडीसाठी पाणी उद्या सोडणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

नाशिक : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वाढत्या दबावापुढे जनभावनांचा विचार न करता सोमवारी (ता. २९) नाशिक जिल्ह्यातील तीनही धरणसमूहातून पाणी सोडण्याच्या तयारीवर अंतिम हात फिरविला गेला. विरोध लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचा तसेच पाणीचोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटप करण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांमधून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, असे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी मंगळवारी (ता. २३) दिले.

नाशिक : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वाढत्या दबावापुढे जनभावनांचा विचार न करता सोमवारी (ता. २९) नाशिक जिल्ह्यातील तीनही धरणसमूहातून पाणी सोडण्याच्या तयारीवर अंतिम हात फिरविला गेला. विरोध लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचा तसेच पाणीचोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटप करण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांमधून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, असे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी मंगळवारी (ता. २३) दिले.

या आदेशामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी कंबर कसली तसेच उच्च न्यायालयातही या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. तथापि, न्यायालयाने दिवाळीनंतर त्यावर सुनावणी करण्याचा निर्णय दिल्यामुळे आता पाणी सोडण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. दुसरीकडे पाटबंधारे महामंडळाने पाणी सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.

धरणातून पाणी सोडण्यापूर्वी धरणावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, त्यासाठी पोलिस खात्याला पत्र देण्यात आले आहे. तर नदीच्या दुतर्फा पाण्याची चोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी वीज कंपनीलाही विनंती करण्यात आली असून, नदीपात्रात असलेल्या सिमेंट बंधाऱ्यांचे निडल्स काढले जात आहेत. भावली, भाम या धरणांतून दारणात पाणी सोडण्यात येत आहे. ही सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर साधारणत: सोमवारी (ता. २९) जिल्ह्यातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली.

विसर्गाचे चित्रीकरण
‘जायकवाडी’साठी पाणी सोडण्यापूर्वी आणि प्रवाह चालू असतानाचे चित्रीकरण, छायाचित्रण करण्याचे तसेच फोटो व चित्रीकरणावर वेळ, तारखेचा शिक्का असावा, त्यात कोणत्याही प्रकारचे एडिटिंग करू नये, अशाही सूचना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अ. प्र. कोहिरकर यांनी दिल्या आहेत.

इतर बातम्या
खानदेशात तूर खरेदीबाबत ऑफलाइन नोंदणी...जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...