राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल १०० ते १२५० रुपये

अकोल्यात विक्रीसाठी अालेले कलिंगड.
अकोल्यात विक्रीसाठी अालेले कलिंगड.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल १०० ते १२०० रुपये  कोल्हापूर: येथील बाजार समितीत कलिंगडाची दररोज दोन ते तीन हजार डझनांची आवक होत आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याच्या विविध भागातून कलिंगडाची आवक होत आहे. कलिंगडास डझनास १०० ते १२०० रुपये दर मिळत आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्‍वभमीवर शहरात छोट्या छोट्या फळ विक्रेत्यांकडून कलिंगडाची मागणी वाढत असल्याने दरात वाढ कायम असल्याचे फळ विक्रेत्यांकडून दररोज मागणी वाढत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. येत्या महिन्याभरात कलिंगडाचे दर अशाच प्रमाणात स्थिर राहतील, अशी शक्‍यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली. बाजार समितीतील आवक व दर (प्रतिडझन/रुपये)  

तारीख     आवक     किमान     कमाल
४  एप्रिल  १५००     ५०     १२००
३० मार्च १२००     १०० ११५०
२३ मार्च ११००     ७० १०००

परभणीत प्रतिक्विंटल ४०० ते ८५० रुपये परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१२) कलिंगडाची (टरबूज) ६०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ८५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केट मधील सूत्रांनी दिली. सध्या स्थानिक परिसरातून येथील फळे मार्केटमध्ये कलिंगडाची आवक होत आहे.गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ६०० ते १००० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल ३०० ते ८५० रुपये दर मिळाले. या आठवड्यात आवक कमी झाली आहे. गुरुवारी ६०० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ४०० ते ८५० रुपये होत, तर किरकोळ विक्री १० ते  १५ रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती असे व्यापारी सय्यद नईम यांनी सांगितले. बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

तारिख     आवक     किमान     कमाल
२२ मार्च  ८००     ३५०     ७००
२९ मार्च १०००     ३००     ६००
५ एप्रिल  ८००     ४००     ८००
१२ एप्रिल ६००     ४००     ८५०

नागपुरात प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये  नागपूर  ः किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये प्रतिकिलोने विकल्या जाणाऱ्या कलिंगडाचे घाऊक बाजारात ७०० ते १००० रुपये क्‍विंटलचे दर आहेत. बाजारात कलिंगडाची रोजची सरासरी आवक १५० क्‍विंटलच्या घरात आहे. कळमणा बाजार समितीत कलिंगडाची वाढती आवक आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यात शेतकरी मोठ्या क्षेत्रावर याची लागवड करतात. मार्च महिन्याच्या सुरवातीला ४०० ते ८०० रुपये क्‍विंटलचा दर कलिंगडाचा होता. त्या वेळी ६५ ते १०० क्‍विंटलची आवक होती. १९ मार्चपासून दरात काहीशी तेजी अनुभवण्यात आली.६०० ते ९०० रुपये क्‍विंटलपर्यंत हे दर पोचले. आवकही याच काळात वाढीस लागत ती १४० ते १५० क्‍विंटलवर पोचली. २६ मार्चपासून दरात पुन्हा वाढ होत हे दर ७०० ते १००० रुपये क्‍विंटलवर पोचले. आजपर्यंत हे दर स्थिर असून, त्यात कमी होण्याची शक्‍यता नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.      अकोल्यात प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपये अकोला : उष्णतेच्या बाबतीत देशात पहिल्या पाचमध्ये असलेल्या अकोला शहरातील बाजारपेठेत सध्या टरबूज (कलिंगड) ५०० ते ९०० रुपये क्विंटल दराने विकत अाहे. किरकोळ विक्री मात्र दुप्पट ते तिप्पट दरांनी म्हणजेच सर्रास २० रुपये किलोने होत अाहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठेत कलिंगडाची अावक सुरू अाहे. या काळात कलिंगडाची मोठी अावक होते. सध्या हा बाजारात दररोज ८० ते ९० टन अावक अाहे. यात अव्वल दर्जाचे कलिंगड ८०० ते ९०० रुपये दराने तर दुय्यम प्रतीचा माल ५०० ते ५५० रुपये क्विंटलने ठोक विकल्या जात अाहे. यावर्षी हंगाम सुरु झाला तेव्हापासून कलिंगडाचे दर ५०० ते ८०० दरम्यान स्थिरावलेले अाहेत. अकोला, बुलडाणा जिल्ह्यातून या ठिकाणी दररोज अाठ ते दहा गाड्या अावक अाहे. एका गाडीत अाठ ते १० टन वजनाची फळे असतात.  उष्णता दररोज वाढत असून अावक थोडी कमी होत अाहे. पुढील महिन्यात अाणखी मागणी वाढणार अाहेत.     पुण्यात प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गुरुवारी (ता. १२) कलिंगडाची सुमारे २५ टेंपो आवक झाली हाेती. या वेळी प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर हाेता. दिवसेंदिवस उन्हाळा वाढत असून, कलिंगडाला मागणी वाढत आहे. आवक आणि मागणी माेठी असल्याने दर सरासरी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पुणे बाजार समितीमध्ये पुणे जिल्ह्यांतील विविध तालुकक्यांसह सांगली, सातारा, नगर आणि काही प्रमाणात कर्नाटक राज्यातून देखील आवक हाेत आहे.       सांगलीत प्रतिडझन ५० ते ४०० रुपये सांगली ः येथील विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कलिंगडाची आवक कमी अधिक प्रमाणात होते आहे. गुरुवारी (ता. १२) कलिंगडाची ७०० डझन आवक झाली असून त्यास  ५० ते ४०० रुपये प्रतिडझन असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार समितीच्या आवारात सांगली जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून कलिंगडाची मोठ्या प्रमाणात आवक होते. गतसप्ताहापासून कलिंगडाची आवक कमी अधिक असून  दरही स्थिर आहेत. पुढील सप्ताहात कलिंगडाची आवक वाढण्याची शक्‍यता असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली. जळगावात प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडाची आवक टिकून आहे. दरही महिनाभरापासून सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटलचे मिळाले आहेत. या आठवड्यात दरात किंचीत घसरण झालेली आहे. आवकही काही प्रमाणात वाढली आहे. बुधवारी (ता. ११) २५ क्विंटल आवक झाली. त्याला किमान ३०० व कमाल ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.  जिल्ह्यात रावेर, यावल, चोपडा, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव अशी सर्वत्र कलिंगडाची लागवड बऱ्यापैकी झाली आहे. स्थानिक भागातूनच चांगली आवक होत आहे. तर मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानमधील व्यापारीदेखील रावेर, यावल व चोपडा भागातून कलिंगडाची खरेदी करीत आहेत. थेट शेतात येऊन ही व्यापारी मंडळी खरेदी करीत आहे. मागील आठवड्यात दर्जेदार कलिंगडाची साडेचार रुपये प्रतिक्विंटल या दरात व्यापाऱ्यांनी खरेदी केली. या व्यापाऱ्यांचया हालचाली लक्षात घेऊनच बाजार समितीमधील दर ठरत असल्याची माहिती मिळाली. सोलापुरात प्रतिक्विंटल १०० ते १२५० रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कलिंगडाच्या दरात फारशी सुधारणा नसली, तरी दर मात्र स्थिर आहेत. कलिंगडाला प्रतिक्विंटल १०० ते १२५० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कलिंगडाची आवक वाढली. रोज किमान २० ते २५ हजार किलोपर्यंत आवक होती. बुधवारीही (ता. ११) कलिंगडाची आवक ३९ हजार २२० किलोपर्यंत राहिली. त्याचा दर प्रतिदहा किलोसाठी किमान १० रुपये, सरासरी ५० रुपये आणि सर्वाधिक १२५ रुपये राहिला. त्या आधीच्या आठवड्यातही ४ एप्रिल रोजी साधारणपणे २९ हजार ८४० किलोपर्यंत आवक होती, तर कलिंगडाचा दर किमान १५  रुपये, सरासरी १०० रुपये आण सर्वाधिक ११० रुपये असा मिळाला. त्या आधीच्या सप्ताहातही २८ मार्चला कलिंगडाची  आवक २० हजार किलोपर्यंत राहिली. तर मात्र जैसे थे राहिले. कलिंगडाच्या प्रतिदहा किलोसाठी किमान १५ रुपये, सरासरी ८० रुपये आणि सर्वाधिक १२० रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ८०० ते १२०० रुपये  औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १२) कलिंगडाची १४२ क्‍विंटल आवक झाली. या कलिंगडाला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये क्‍विंटल आणि नगामध्ये दोन प्रकारच्या कलिंगडाची खरेदी केली जाते. २२ फेब्रुवारीला १५७० क्‍विंटल आवक झालेल्या कलिंगडाला १००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. ५ एप्रिलला ७९० क्‍विंटल आवक झालेल्या कलिंगडाला ३०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २९ मार्चला ८३५ क्‍विंटल आवक झालेल्या कलिंगडाचे दर ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० मार्चला ३५० क्‍विंटल आवक झालेल्या कलिंगडला ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचे दर मिळाले. २७ फेब्रुवारीला ११२९ क्‍विंटल आवक झालेल्या कलिंगडाचे दर १००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २८ फेब्रुवारीला १५९०० नगांची आवक झालेल्या कलिगडाला प्रतिशेकडा ८०० ते २२०० रुपयांचा दर मिळाला. ३१ मार्चला २२ हजार ५०० नगांची आवक झालेल्या कलिंगडाचे दर ५०० ते ३८०० रुपये प्रतिशेकडा राहिले. २ एप्रलला १८ हजार नग आवक झालेल्या कलिंगडाला ७०० ते ३२०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला.                         

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com