agriculture news in Marathi, watermelon and muskmelon arrival increased in pune, Maharashtra | Agrowon

पुण्यात कलिंगड, खरबुजाच्या आवकेत वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत घट झाली हाेती. मात्र बहुतांश शेतीमालाचे दर स्थिर हाेते. तर उन्हाळ्याची चाहूल लागली असून, तापमानवाढीस सुरवात झाल्याने कलिंगड, खरबुजाच्या आवकेत वाढ व्हायला सुरवात झाली आहे.  

पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत घट झाली हाेती. मात्र बहुतांश शेतीमालाचे दर स्थिर हाेते. तर उन्हाळ्याची चाहूल लागली असून, तापमानवाढीस सुरवात झाल्याने कलिंगड, खरबुजाच्या आवकेत वाढ व्हायला सुरवात झाली आहे.  

आवकेमध्ये परराज्यांतून जयपूर येथून मटार सुमारे १० ट्रक, राजस्थान येथून गाजर सुमारे ८ ट्रक, गुजरात आणि कर्नाटकातून काेबी सुमारे ४ ट्रक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकातून हिरवी मिरची सुमारे १५ टेंपाे, बंगळूर येथून आले सुमारे ३ टेंपाे आणि आंध्र प्रदेश तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ६ टेंपाे आवक झाली हाेती. स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गाेणी, टॉमेटाे सुमारे सहा हजार क्रेट, हिरवी मिरची ५ टेंपो, सिमला मिरची १२ टेंपाे, फ्लॉवर १५ टेंपो, काेबी २० टेंपाे, काकडी ८ ते १० टेंपो, मटार ४० गाेणी, पावटा ६ टेंपाे, तांबडा भाेपळा १२ टेंपाे, भेंडी ६ तर गवार ४ टेंपाे आवक झाली हाेती. तर कांदा सुमारे २५० ट्रक, आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ४५ ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : १३०-१७०, बटाटा : ६०-११०, लसूण : १५०-३५० आले : सातारी : २२०-२८०, बेंगळूर : २८०, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान - सुरती ४००-५००, टोमॅटो : ३०-६०, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : ३५०-४५०, दुधी भोपळा : ४०-८०, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१४०, कारली : हिरवी ३००-३२०, पांढरी : २५०, पापडी : १६०-१८०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ४०-६०, कोबी : ३०-५०, वांगी : ६०-१२०, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-११०, शेवगा : १५०-२००, गाजर : १२०-१४०, वालवर : १४०-१६०, बीट : ४०-८०, घेवडा : २००-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-१६०, ढेमसे : २००-२२०, भुईमूग : ३००-३५०, पावटा : २५०-२६०, मटार : परराज्य : २००-२२०, स्थानिक : २४०-१५०, तांबडा भोपळा : ८०-१२०, सुरण : ३४०-३५०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे पावणेदाेन लाख, मेथीची सुमारे ८० हजार जुड्या आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव - कोथिंबीर : २००-५००, मेथी : २००-५००, शेपू : ३००-५००, कांदापात : ५००-८०० चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ५००-८०० राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-५००, पालक : ३००-४००, हरभरा गड्डी : ५००-७००.

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर
झेंडू : १०-३०, गुलछडी : २००-४००, बिजली : ५-२०, कापरी : १०-३०, शेवंती : २०-४० ॲस्टर : १०-२०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ३०-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, लिली बंडल : ३-८, जर्बेरा : ५०-७०, कार्नेशियन : १००-२००, कागडा बंडल १००-२००

फळबाजार
रविवारी (ता. १८) फळबाजारात मोसंबी सुमारे ३० टन, संत्री ५० टन, डाळिंब सुमारे ३५ टन, पपई १५ टेंपोे, लिंबे सुमारे ८ हजार गोणी, चिकू २ हजार गाेणी टन, पेरू सुमारे २ टन, कलिंगड ४० टेंपाे, खरबूज २५ टेंपाे,  विविध द्राक्षांची सुमारे ३० टन, स्ट्रॉबेरी ५ टन आवक झाली हाेती.
फळांचे दर पुढीलप्रमाणे ः लिंबे (प्रतिगोणी) : ४०-१००, मोसंबी : (३ डझन) : १३०-२८०, (४ डझन ) : ७०-१४०, संत्रा : (३ डझन) १३०-३००, (४ डझन) : ७०-१४०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१३०, गणेश १०-३०, आरक्ता २०-६० कलिंगड : ८-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-२०, चिकू : प्रतिकिलाे १०-५०, पेरू (२० किलो) : ७००-१०००, बोरे : चेकनट (१० किलो) १३०-१५०, चन्यामन्या : ३५०-४००, उमराण : ३५-६०, द्राक्षे : तासगणेश (१५ किलो) ५००-७००, सुपर सोनाका (१५ किलो) : ७००-१२००, जम्बो (१० किलो) : ४००-८००, सोनाका (१५ किलो) : ६००-८००, स्ट्रॉबेरी (२ किलाे पनेट) ८०-१५०.

मटण, मासळी
वाढत्या उन्हामुळे मासळीची आवक कमी होत आहे. मात्र मागणी कायम असल्याने दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. रविवारी (ता. १८) मासळी बाजारात खोल समुद्रातील ९ टन, खाडीची सुमारे ३०० किलाे, नदीची सुमारे ७०० किलो आणि आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १० टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी परदेशी ठाकूर यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : 
पापलेट : कापरी : १५००, मोठे : १४००, मध्यम : ११००-१२००, लहान : ८००, भिला : ६००, हलवा : ५५०, सुरमई : ५५०-६००, रावस ः लहान : ५५०, मोठा : ६००, घोळ : ६००, करली : २८०, करंदी : २८०, भिंग : २८०, पाला : ७५०-१४००, वाम : २४०-५५०, ओले बोंबील : १६०-२००
कोळंबी ः लहान : ३२०, मोठी : ४८०, जम्बोप्रॉन्स :१५००, ,किंगप्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १६००, मोरी : २००-२८०, मांदेली : १२०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०,
खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : ४८०, तांबोशी : ४४०, पालू : २८०, लेपा : १६०-२४०, शेवटे : २८०, बांगडा : लहान : १४०, मोठे : २०० पेडवी : ८०, बेळुंजी : १४०, तिसऱ्या : १६० खुबे : १६०, तारली : १४०
नदीची मासळी : रहू : १६०, कतला : २००, मरळ : २८०-४८०, शिवडा : २४०, चिलापी : ८०, मांगूर : १४०, खवली : २००, आम्ळी : १०० खेकडे : २००, वाम : ४८०.

मटण ः बोकड : ४४०, बोल्हाई  : ४४०, खिमा : ४४०, कलेजी : ४८०. 
चिकन : चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०. 
अंडी : गावरान : शेकडा : ८२०, डझन : १०८ प्रतिनग : ९.००. इंग्लिश : शेकडा : ४२५ डझन : ६० प्रतिनग : ५.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...