agriculture news in marathi, waters scaricity increase, akola, maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 मे 2018
अकाेला  ः या वर्षी उन्हाच्या झळा जशा वाढल्या तसेच पाणीटंचाईचे चटकेसुद्धा अधिक सोसावे लागत अाहेत. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडे पडल्याने त्यावर अाधारित नळ पाणी योजना बंद झाल्या.  ठिकठिकाणी हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ ग्रामस्थांवर अाल्याचे दिसून येते.
 
या वर्षात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शिवाय जो पाऊस पडला तो कमी दिवस पडल्याने एकही प्रकल्प भरू शकला नव्हता. यामुळे मे महिन्यातच जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला. अाता जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांचे लक्ष हे पावसाच्या अागमनाकडे लागले अाहे.
 
अकाेला  ः या वर्षी उन्हाच्या झळा जशा वाढल्या तसेच पाणीटंचाईचे चटकेसुद्धा अधिक सोसावे लागत अाहेत. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडे पडल्याने त्यावर अाधारित नळ पाणी योजना बंद झाल्या.  ठिकठिकाणी हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ ग्रामस्थांवर अाल्याचे दिसून येते.
 
या वर्षात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शिवाय जो पाऊस पडला तो कमी दिवस पडल्याने एकही प्रकल्प भरू शकला नव्हता. यामुळे मे महिन्यातच जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला. अाता जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांचे लक्ष हे पावसाच्या अागमनाकडे लागले अाहे.
 
अकोला जिल्ह्यात ३८ मोठे, मध्यम व लघुप्रकल्प अाहेत. मागील वर्षात जिल्ह्यात ७९ टक्के पाऊस अवघ्या ३७ दिवसांत पडून गेला. सरासरी ६९७.३ मिमीच्या तुलनेत केवळ ५५० मिमी पाऊस झाला होता. 
 
कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प भरू शकले नव्हते. त्यामुळे काही भागात दिवाळीनंतरच पाणीटंचाई जाणवू लागली. प्रामुख्याने खारपाणपट्ट्यात पाणीसमस्या अधिक तीव्र झालेली अाहे. जिल्ह्यातील उमा व निर्गुणा या मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला तर ३३ लघुप्रकल्पांपैकी बाेरगाव, सिसा उदेगाव, कुंभारी, सुकळी, चिंचपाणी, भिलखेड, धारूर, शहापूर बृहत, पाेपटखेड, पिंपळशेंडा, शिवण खुर्द, सावरखेड, जनुना, घाेटा, माेझरी, झाेडगा, माेऱ्हळ, हाताेला, दगडपारवा, तुळजापूर, गावंडगाव, सावरगाव बा., झरंडी, हिवरा, कसुरा, तामशी हे प्रकल्प पूर्णतः अाटले अाहेत.
 
उर्वरित नऊ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. काटेपूर्णा, माेर्णा, पिंपळगाव, पिंपळगाव हांडे, इसापूर, कानडी, घाेंगा, पातूर, विश्वमित्रा या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या केवळ वान धरणामध्ये ६४.५६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पातून सध्या शेकडो गावांना पाणी पुरविले जात अाहे. पिण्यासाठी पाणी संग्रहीत केल्याने रब्बीत सिंचनासाठी पुरेसे पाणी या प्रकल्पातून शेतकऱ्यांना मिळू शकले नव्हते.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...