agriculture news in Marathi, watershed development ex director caught by anti corruption , Maharashtra | Agrowon

माजी मृद्‌संधारण संचालक ‘लाचलुचपत'च्या जाळ्यात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गैरव्यवहारांची खाण असलेल्या मृद्संधारण विभागाचे माजी संचालक सुरेश अंबुलगेकर यांच्याकडे सुमारे दीड कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंबुलगेकर, त्यांची पत्नी व मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

कृषी खात्याच्या सेवेत असताना अंबुलगेकर यांनी मृदसंधारण विभागाचे संचालक, तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे विस्तार संचालक म्हणूनही काम पाहिले होते. या कार्यकाळात त्यांचे विविध निर्णय वादग्रस्त ठरले होते.

पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गैरव्यवहारांची खाण असलेल्या मृद्संधारण विभागाचे माजी संचालक सुरेश अंबुलगेकर यांच्याकडे सुमारे दीड कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंबुलगेकर, त्यांची पत्नी व मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

कृषी खात्याच्या सेवेत असताना अंबुलगेकर यांनी मृदसंधारण विभागाचे संचालक, तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे विस्तार संचालक म्हणूनही काम पाहिले होते. या कार्यकाळात त्यांचे विविध निर्णय वादग्रस्त ठरले होते.

‘‘अंबलुगेकर यांच्या ज्ञात संपत्तीची आम्ही प्राथमिक चौकशी केली आहे. उघड चौकशीदरम्यान जुलै १९८० ते जून २०१४  या कालावधीतील संपत्तीचे परीक्षण करण्यात आले. त्यात त्यांच्याकडे आतापर्यंत एक कोटी ५५ लाख १५ हजार ४२६ रुपये इतकी अपसंपदा आढळली, ’ अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी दिली. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अंबुलगेकरांच्या मालमत्तेची अजून चौकशी केली जाणार आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी अजून सखोल माहिती घेतली जाणार आहे. अंबुलगेकर सध्या नांदेडमध्ये असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी व पंचनामे अजूनही चालू आहेत. 

बेहिशेबी मालमत्ता संपादन करण्याच्या कृत्यात अंबुलगेकर यांची पत्नी सौ. मंगाराणी व मुलगा नितीन यांचाही सहभाग आढळल्याने या तिघांविरोधात भ्रष्टाचार प्रतबिंधक अधिनियम १९८८ च्या कलम १३ (१) (बी) अन्वये बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

मलईदार विभाग
मृद्‌संधारण विभागाचे विद्यमान संचालक डॉ. कैलास मोते यांच्यावर यापूर्वीच दीड कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल केल्यापासून ते कार्यालयात आलेले नाहीत. ते रजेवर असून त्यांच्या अनुपस्थितीत गैरव्यवहाराच्या महत्त्वाच्या फायलींचा ताबा, अनेक प्रकरणांच्या चौकशींची सद्यःस्थिती याविषयी संभ्रमावस्था आहे. मृद्‌संधारण विभाग हा कृषी खात्यातील सर्वाधिक मलईदार विभाग म्हणून ओळखला जातो. या विभागाची जबाबदारी सांभाळलेल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली असल्याची चर्चा आयुक्तालयात सुरू आहे. 

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...