agriculture news in marathi, On the way to burn crops in the eastern belt | Agrowon

पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात पिके जळण्याच्या मार्गावर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील शिरूर, दौड, इंदापूर, बारामती, खेडच्या पूर्व भागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे या तालुक्यांतील अनेक ठिकाणी पिके जळू लागली आहेत. पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु सोयाबीन, उडीद, तूर अशा पिकांवर काही ठिकाणी रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील शिरूर, दौड, इंदापूर, बारामती, खेडच्या पूर्व भागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे या तालुक्यांतील अनेक ठिकाणी पिके जळू लागली आहेत. पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु सोयाबीन, उडीद, तूर अशा पिकांवर काही ठिकाणी रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात दोन लाख ३० हजार ८३० हेक्टरपैकी एक लाख ५५ हजार ८०७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी ६७ टक्के पेरणी झाली. जिल्ह्यात भात पिकांची ६१ हजार ७८३ हेक्टरवर पुनर्लागवड झालेल्या आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पावसामुळे भात पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र, पूर्व पट्ट्यातील तालुक्यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. सुरवातीच्या काळात अत्यल्प झालेल्या पावसामुळे बाजरी पिकांना दिलासा मिळाला होता. गेल्या महिन्यापासून  शिरूर, दौड, इंदापूर, बारामती व पुरंदर या तालुक्यामध्ये पावसाअभावी पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली आहे.

जूनच्या सुरवातीच्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे मूग व उडीद या पिकांची पेरणी क्षेत्र कमी झाले आहे. सुरवातीस पेरलेले मूग पीक फुलोऱ्यात असून शिरूर तालुक्यात काही ठिकाणी पावसाअभावी वाढीवर परिणाम झाला आहे. भुईमूग पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पिकांचे सरासरी पाच हजार २०० हेक्टर क्षेत्र असून हे क्षेत्र भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव व बारामती तालुक्यामध्ये आहे. जिल्ह्यामध्ये अठरा हजार ७६६ हेक्टरवर सोयाबीन पिकांची पेरणी झाली आहे.

सोयाबीन पिकावर अल्प प्रमाणात पाने खाणारी अळी, चक्री भुंगे यांचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभागामार्फत योग्य त्या उपाययोजना सुचविल्या जात आहेत. मका पिके वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकांची शिरूर, बारामती, इंदापूर, दौड या तालुक्यांमध्ये अवघे ४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पिके वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी रोग, कीडींचा प्रादुर्भाव झाला आहे.  

सुरवातीच्या कालावधीत अल्प झालेल्या पावसावर काही शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीनची पेरणी केली होती. त्यानंतर पावसाची अपेक्षा होती. आता तीन महिने उलटली तरीही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीनसारखी पिके जळून गेली आहेत.
- भाऊसाहेब पळसकर, करर्डे, ता. शिरूर, जि. पुणे

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...