राज्यात दुधाचा एकच ब्रॅँड बनविणार : जानकर
रहमान शेख
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच महाराष्ट्राचा दुधाचा एकच ब्रॅँड ‘आरे शक्ती’ सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस असून, शेतकऱ्यांनी यापुढे शासकीय दूध डेऱ्यांनाच आपले दूध घालावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले.

राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच महाराष्ट्राचा दुधाचा एकच ब्रॅँड ‘आरे शक्ती’ सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस असून, शेतकऱ्यांनी यापुढे शासकीय दूध डेऱ्यांनाच आपले दूध घालावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किसान आधार संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी श्री. जानकर बोलत होते. या वेळी आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार, कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी, डॉ. व्यंकट मायंदे, डॉ. पी. एल. माहेश्‍वर, वाल्मीचे महासंचालक डॉ. एच. के. गोसावी, विद्यापीठाचे संचालक उपस्थित होते.

जानकर पुढे म्हणाले, दुधाचे एक राज्यस्तरीय धोरण असून, दुधाच्या रकमेतील ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना व ३० टक्के रक्कम प्रक्रिया उद्योगांना मिळेल. तसेच जलयुक्त शिवाराबरोबरच शेतकऱ्यांना मासळीयुक्त तलाव व चारायुक्त शिवार या योजना लवकरच सुरू होतील.

राज्यात प्रतिदिन १.५० कोटी लिटर दूध बाहेरील राज्यांतून येते. आजही आपले राज्य दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण नाही. राज्यामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत दुधास सर्वांत जास्त भाव दिला जातो.

पशुधन व मत्स्य विभागांमध्ये देशामध्ये राज्याचा १२ वा क्रमांक लागतो, गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे या विभागांसाठीचे बजेट केवळ १४० कोटी इतके होते, त्यातील १०० कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटीच खर्च होत होते, आता हे बजेट राज्यसरकारने ६५० कोटींपर्यंत नेले असून, केंद्राने १००० कोटी रुपयांचे अनुदान डेअरी उत्पादनांसाठी जाहीर केले आहे. राज्याचे स्थान देशामध्ये पुढील वर्षी आघाडीवर नेण्याचा मानस त्यांनी या वेळी बोलून दाखविला.

पोपटराव पवार, कुलगुरू डॉ. सुभाष पुरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी प्रास्तविक केले.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...