परभणी जिल्ह्यात मोसंबी, संत्रा, पेरूसाठी फळपीक विमा लागू

परभणी जिल्ह्यात मोसंबी, संत्रा, पेरूसाठी फळपीक विमा लागू
परभणी जिल्ह्यात मोसंबी, संत्रा, पेरूसाठी फळपीक विमा लागू

परभणी : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना २०१८-१९ अंतर्गत मृग बहारासाठी जिल्ह्यातील मोसंबी, संत्रा, पेरू या फळपिकांचा समावेश केला आहे. ३० मंडळामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मोसंबी आणि संत्रा पिकांसाठी प्रतिहेक्टरी ३,८५० रुपये आणि पेरू पिकासाठी प्रतिहेक्टरी २,७५० रुपये विमा हप्ता बॅंकेत, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी भरून पिके संरक्षित करता येतील. विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारिख १४ जून २०१८ आहे. विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. हवामानाधारित फळपीक योजना लागू असलेली फळपीक, तालुकानिहाय मंडळे, मोसंबी पिकांसाठी परभणी तालुका ः परभणी, झरी, जिंतूर तालुका ःजिंतूर, सेलू तालुका ः सेलू, वालूर, मानवत तालुका ः मानवत, केकरजवळा, पाथरी तालुका ः पाथरी, हादगांव बु., पूर्णा तालुका ः चुडावा, लिमला, संत्रा पिकांसाठी परभणी तालुका ः पेडगांव, जांब, जिंतूर तालुका ः जिंतूर, सावंगी म्हाळसा, सेलू तालुका ः सेलू, मानवत तालुका ः मानवत, कोल्हा, पाथरी तालुका ः पाथरी, पूर्णा तालुका ः चुडावा, कात्नेश्वर, ताडकळस, लिमला.  पेरू पिकासाठी परभणी तालुका ः परभणी, झरी, सेलू तालुका ः सेलू, वालूर या मंडळाचा समावेश आहे. या योजनेचा लाभ जास्तीजास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com