agriculture news in marathi, Weather Based Pokwima for Nanded | Agrowon

नांदेडमध्ये फळपिकांसाठी हवामानावर आधारित पीकविमा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

नांदेड ः पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना अंबिया बहाराकरिता लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील केळी, मोसंबी, आंबा, द्राक्षे या पिकांचा या योजनेअंतर्गंत समावेश आहे. भारतीय कृषी पीक विमा कंपनी मार्फत जिल्ह्यातील अधिसूचित ४७ मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी, मोसंबी या पिकांसाठी ३१ आॅक्टोबर पर्यंत, द्राक्षासाठी १५ आॅक्टोबर पर्यंत आणि आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येणार आहेत. या संदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

नांदेड ः पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना अंबिया बहाराकरिता लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील केळी, मोसंबी, आंबा, द्राक्षे या पिकांचा या योजनेअंतर्गंत समावेश आहे. भारतीय कृषी पीक विमा कंपनी मार्फत जिल्ह्यातील अधिसूचित ४७ मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी, मोसंबी या पिकांसाठी ३१ आॅक्टोबर पर्यंत, द्राक्षासाठी १५ आॅक्टोबर पर्यंत आणि आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येणार आहेत. या संदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

हवामानावर आधारित फळपिक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी कर्जदार शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे. मात्र, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.हवामानावर आधारित फळपिक विमा अांबिया बहारामध्ये विहित मुदतीमध्ये विमा प्रस्ताव सादर करुन जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. विमा हप्ता तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत आले आहे.

फळपीक विमा योजनेत समाविष्ट अधिसूचित फळपीक, तालुका निहाय मंडळांची संख्या

केळी - नांदेड तालुका ः तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. अर्धापूर तालुका ः अर्धापूर, दाभड, मालेगाव. मुदखेड तालुका ः मुदखेड, मुगट, बारड.हदगाव तालुका ः हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी. लोहा तालुका ः शेवडी बा. भोकर तालुका ः भोकर. देगलूर तालुका ः मरखेल, हाणेगाव. किनवट तालुका ःकिनवट, बोधडी.

मोसंबी- नांदेड तालुका ःलिंबगाव, विष्णूपुरी. मुदखेड तालुका ः बारड. अर्धापूर तालुका ः मालेगाव.

आंबा -अर्धापूर तालुका ः मालेगाव, दाभड.मुखेड तालुका ः मुक्रमाबाद.

द्राक्षे - नांदेड तालुका ः तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगांव, विष्णुपूरी.
अर्धापूर तालुका ः अर्धापूर, दाभड, मालेगाव, मुदखेड तालुका ः मुदखेड, मुगट, बारड, हदगाव तालुका ः हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी. लोहा तालुका ः शेवडी बा.भोकर तालुका ः भोकर. देगलूर तालुका ः मरखेल, हाणेगाव.

इतर बातम्या
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवा :...परभणी : टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातील...
द्राक्ष उत्पादकांना तज्ज्ञांचे बांधावर...नाशिक : द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या अडचणी...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळनिधीची कार्यवाही तत्काळ करा :...जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी...
दुष्काळ निवारणार्थ समन्वयाने काम करा :...नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे...
सांगली : तेरा छावण्यांत पाच हजारांवर...सांगली : दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...